तुळजापुरात डॉ. आंबेडकर चौकात अवैध दारूची वाहतूक करणारा तरुण जाळ्यात; ३९,९५० रुपयांच्या मालासह दुचाकी जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी ;-
शहर पोलिसांनी अवैध दारू वाहतूक व बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुमारे ३९ हजार ९५० रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी
तालुक्यातील एका तरुणावर महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश झुंबरसेन भड (वय २५ वर्षे, रा. गौडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४:३० वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोलिसांनी संशयित हालचालींवरून एका दुचाकीस्वाराला अडवून तपासणी केली. या तपासणीत आरोपीच्या ताब्यात अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला दारूचा साठा मिळून आला. पोलिसांनी तत्काळ सर्व साहित्य जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
दारूचा साठा- देशी व विदेशी दारूच्या एकूण ४५ बाटल्या (अंदाजे मूल्य: ₹३९,९५०)
वाहन- अवैध दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी.
या प्रकरणी तुळजापूर पोलिसांनी अवैध मद्य जप्त करून आरोपी मंगेश भड याच्याविरोधात महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम-६५ (ई) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
तरी एक प्रश्न अनुत्तरीत राहिला यांच्याकडे दारू साठा आला कुठून आणि जाने हा दारू साठा पुरवला त्यांच्यावरती पोलीस कारवाई करणार का?






