Best News Portal Development Company In India

कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास त्यात यश निश्चित मिळते : धमेंद्र माने !

कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास त्यात यश निश्चित मिळते : धमेंद्र माने !
———————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
आपण कोणतेही काम, उद्योग किंवा सामाजिक, राजकीय,धार्मिक चळवळीतील कार्य प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास त्यात यश निश्चित मिळते.तेव्हा तरुणांनी आत्मविश्वासाने व प्रामाणिकपणे आणि निष्ठेने छोटे-मोठे उद्योग सुरु करून बेरोजगारीवर मात करावी असे प्रतिपादन सोलापूर येथील उद्योजक शकुंतला लॉजचे मालक चालक तथा सेवानिवृत्त सहशिक्षक धमेंद्र माने यांनी इटकळ तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

दि.१४ सप्टेंबर २०२६ रोजी सराठी तालुका तुळजापूर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त माझी सैनिक सुभेदार सुरेश हरिबा सुरवसे व सुरवसे परिवाराच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील इटकळ ते अक्कलकोट या मुख्य रस्त्या लगत येथील साई मंगल कार्यालया इतकळ जवळ दुकान गाळे बांधले असून त्या नवीन सुरवसे दुकान गाळ्याच्या उद्घाटन समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उद्घाटक म्हणून महेंद्र माने बोलत होते. प्रारंभीर तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून येथील नूतन सुरवसे दुकान गाळ्याचे उद्घाटन उद्योजक महेंद्र माने, पोलीस निरिक्षक राकेश बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा राजश्रीताई कदम,भारतीय बौद्ध महासभेचे बाळासाहेब बागडे,ज्ञानदेव बनसोडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, रिपाइं नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे,सहशिक्षिका पल्लवी माने,भटक्या विमुक्त पारधी समाज संघटनेचे नेते पंडीत भोसले,आदींची शुभेच्छा पर भाषणे झाली.

या वेळी रामभरोसे हॉटेलचे मालक शंकर वाघमोडे,श्रध्दा बार चे चालक खंडेराव बंडगर (नाना),सराटी ग्रा.प.चे माजी सरपंच प्रकाश जेवळे, माजी उपसरपंच शहाजी गायकवाड, जेष्ठ कार्यकर्ते तथा सराटी ग्रा.प. विद्यामान सदस्य महादेव सुरवसे,शेकूंबर फकीर,तय्यब मुजावर
सहशिक्षक बसवेश्वर परकाळे,निलेगावचे ग्रा.प.सदस्य गोवर्धन दुपारगुडे, युवा कार्यकर्ते सुदर्शन गायकवाड,प्रदीप भोसले महिला कार्यकर्त्या अर्चनाताई माने, जयाताई सुरवसे,मातोश्री शकुंतला माने,सुंदरबाई खंडेराव बंडगर,शुभांगी बनसोडे सह 1 ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव तथा पत्रकार एस.के.गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन युवा उद्योजक तथा अभियंता अक्षय सुरवसे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india