*चला शाळेत जाऊया उपक्रमांतर्गत* *गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत यांची उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल ला भेट*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील आयएसओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल ला चला शाळेत जाऊ या उपक्रमांतर्गत गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत यांनी भेट दिली भेटीदरम्यान शाळेतील भौतिक सुविधा शैक्षणिक बाबी व गुणवत्तेची प्रत्यक्ष पाहणी करून वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधला .
शाळेचा पट, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय स्वच्छता, वर्ग अध्यापनाचे निरीक्षण, विद्यार्थ्यांची संपादन पातळी, वाचन ,लेखन ,अभिव्यक्ती, संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया, शाब्दिक उदाहरणे, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची संपादनूक,डॉक्टर जयंत नारळीकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रमाची अंमलबजावणी, विविध शिष्यवृत्या, नवोदय परीक्षा, आठवी एन एम एम एस परीक्षा, मूल्यसंवर्धन उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, शाळेतील विविध समित्या, सीसीटीव्ही कॅमेरे,उपलब्ध शैक्षणिक साहित्य, शालेय ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा ,एफ एल एन किट,अटल टिकरिंग लॅब, आनंददायी शनिवार, पी एम पोषण आहार, माजी विद्यार्थी संघ,विविध खेळ, क्रीडांगण, खेळाची तयारी,पर्यावरण संवर्धन इत्यादी बाबींची पाहणी करून
शाळेतील उल्लेखनीय बाबींचे कौतुक करतानाच शाळेतील त्रुटी बद्दल सविस्तर मार्गदर्शन करून मुख्याध्यापक व शिक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचारी व इतर शिक्षक उपस्थित होते.








