Best News Portal Development Company In India

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा; मागणी न मानल्यास ‘ताळे ठोक’ आंदोलनाचा इशारा!

मराठवाड्यात दुष्काळाचे सावट: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला थेट इशारा; मागणी न मानल्यास ‘ताळे ठोक’ आंदोलनाचा इशारा!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
मराठवाड्यात यंदा पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे शेतकरी अत्यंत बिकट परिस्थितीत सापडला आहे. सरकारच्या उदासीन धोरणामुळे आणि केवळ कागदोपत्री ठरणाऱ्या कर्जमाफीच्या योजनांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष घणश्याम चौधरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी केला आहे.

​कर्जमाफी व सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेत: निवडणुकीपूर्वी ‘सातबारा कोरा करू’ असा शब्द देणाऱ्या सरकारने प्रत्यक्षात जाचक अटी-शर्ती लावून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे प्रदेशाध्यक्ष घणश्याम चौधरी यांनी सांगितले.
​प्रतिनिधींच्या राजकीय स्टंटबाजीवर प्रहार: जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि पालकमंत्री दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी केवळ फोटोसेशन आणि राजकारणात व्यस्त असल्याचा आरोप करण्यात आला.

​आत्महत्यांचे सत्र व प्रशासकीय दुर्लक्ष- तुळजापूर तालुका आणि परंडा परिसरात दुष्काळ व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची वस्तुस्थिती मांडत, सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी करण्यात आली.

​कार्यालयांना कुलूप ठोकणार-
येत्या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र ‘ताळे ठोक’ आंदोलन छेडले जाईल. तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांचे कामकाज बंद पाडून सरकारला जाब विचारला जाईल, असा सज्जड इशारा संघटनेच्या मराठवाडा प्रदेशाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी व पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india