Best News Portal Development Company In India

उमरग्यात ६ लाखांचा अवैध गुटखा जप्त! बीडच्या दोघांवर गुन्हा दाखल; तलमोड चेकपोस्टवर पोलिसांची धडक कारवाई!

उमरग्यात ६ लाखांचा अवैध गुटखा जप्त! बीडच्या दोघांवर गुन्हा दाखल; तलमोड चेकपोस्टवर पोलिसांची धडक कारवाई!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
बीड येथून स्विफ्ट डिझायर गाडीतून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक उमरगा पोलिसांनी धडक कारवाई करत उधळून लावली आहे. तलमोड चेक पोस्टवर रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी ५ लाख ७४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून बीड येथील दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​नाकाबंदी अन् ऐनवेळी सापळा-
उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, स्विफ्ट डिझायर गाडी (क्र. MH 14 GD 1337) मधून बंदी असलेला गुटखा वाहून नेला जात आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तलमोड चेक पोस्ट येथे अचानक नाकाबंदी लावून सापळा रचला. दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास संशयित गाडी अडवून पोलिसांनी विचारपूस व झाडाझडती घेतली.

​वाहनासह गुटखा जप्त-
गाडीची पाहणी केली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला हिरा पान मसाला (१८९० पुडे) आणि रॉयल ७१७ सुगंधी तंबाखू (१५७५ पुडे) असा एकूण २,७४,०५० रुपये किमतीचा अन्न पदार्थ साठा आढळला. पोलिसांनी गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाखांची स्विफ्ट गाडी असा एकूण ५,७४,०५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

​या आरोपींवर गुन्हा दाखल-
​शेख रेहान शेख रहिम (वय ३१ वर्ष, रा. मोमीनपुरा, हुजरा मस्जिद जवळ, ता. जि. बीड) – चालक
​सय्यद अफरोज सय्यद सलीम (वय २८ वर्ष, रा. मोहम्मदिया कॉलनी, मोमीनपुरा, ता. जि. बीड) – सहकारी
​या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न व सुरक्षा मानके कायदा २००६ च्या कलम २६(२)(iv), २७(३)(डी), २७(३)(ई), ३०(२)(अ), ५९ अन्वये १५ सप्टेंबर रोजी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​सदर कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. सुर्यवंशी व त्यांच्या पथकाने केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india