Best News Portal Development Company In India

दिंडेगावात बंद घर फोडून १ लाख ५४ हजारांचे दागिने लंपास; पत्रा उचकटून चोरट्यांचा डल्ला, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल!

दिंडेगावात बंद घर फोडून १ लाख ५४ हजारांचे दागिने लंपास; पत्रा उचकटून चोरट्यांचा डल्ला, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल!

तुळजापूर प्रतिनिधी:-
घरचे लोक शेतात गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने पळवल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​शेतात गेले अन् मागे घर फोडले-
दिंडेगाव येथील रहिवासी सचिन अशोक सुरवसे (वय २७) हे १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास घराला व्यवस्थित कुलूप लावून नातेवाईकांसह शेतात गेले होते. यादरम्यान सकाळी ८.०० ते दुपारी ४.०० वाजेच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाट उघडून त्यातील ४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चांदीचे दागिने असा एकूण १,५४,००० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

​नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल-
शेतातून घरी परतल्यानंतर सुरवसे यांच्या हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी फिर्यादी सचिन सुरवसे यांनी १५ सप्टेंबर २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३) (घरफोडी) आणि ३०५(अ) (घरात केलेली चोरी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india