कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलिसांची येथील सनराईज स्कूलला भेट : विविध विषयावर केले मार्गदर्शन
——————————————————
तुळजापूर (प्रतीनिधी ):
धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दि.६ डिसेंबर २०२५ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनाचे अवचित साधुन तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गोकुळ ठाकूर व महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस हवालदार पंडित शिंदे, नितीन मुळे,. सायबर पोलीस ठाण्याचे पो.अ. मकसूद काजी,नितीन भोसले, गोपाल सलगर, उमेश माने मपोहेकाँ कोरे सह पोलीस पथकाने कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत तामलवाडी येथील सनराईज स्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांना विविध विषयाचे कायदेविषयक मार्गदर्शन करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना केले अगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन.
या याप्रसंगी उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने शालेय विद्यार्थ्यांना पोलिसा विषयी समाजात असलेले समज गैरसमज,बाल लैंगिक अत्याचार कायदा,वाहतुकीचे नियम,112 नंबर वर कॉल करून पोलीसांची मदत मागणे, पास्को कायद्यांतर्गत होणारी कारवाई, मुलींच्या बाबतीत बॅड टच गुड टच आदी विषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.






