Best News Portal Development Company In India

आमदार प्रविण स्वामी यांच्याकडून उमरगा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश.

आमदार प्रविण स्वामी यांच्याकडून उमरगा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी; तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यात पावसाने दीर्घ खंड दिल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे करपून गेली असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी मा. आमदार प्रविण स्वामी सर यांनी उमरगा तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन पीक नुकसानीची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली व बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.

आमदार प्रविण स्वामी यांनी आज सकाळी ९:०० वाजल्यापासून तालुक्यातील बलसुर, काळा लिंबाळा, कलदेव लिंबाळा, समुद्राळ, कडदोरा आणि व्हताळ या गावांचा दौरा केला. या पाहणी दौऱ्यादरम्यान करपलेली पिके आणि बाधित शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ व वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यास उपविभागीय अधिकारी श्री दत्तू शेवाळे साहेब (उमरगा), नायब तहसीलदार श्री परिस्कर, अधिकारी श्री (पं.स.), तालुका कृषी अधिकारी श्री सुनील शिंदे, तसेच जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणचे उपविभागीय अभियंता प्रमुख उपस्थित होते.

“शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार”
यावेळी बोलताना आमदार प्रविण स्वामी म्हणाले, “पावसाच्या ओढ्यामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी राजा हवालदिल झाला असून त्याला या संकटातून बाहेर काढणे ही आपली पहिली प्राथमिकता आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सरसगट क्षेत्राचे पंचनामे करावेत. बाधीत शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य ती भरपाई व मदत मिळवून देण्यासाठी मी वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करेन.”
या पाहणी दौऱ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, गावचे सरपंच, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail