Best News Portal Development Company In India

मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व पालकांची आहे : महेश कदम!

मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी व पालकांची आहे : महेश कदम!
————————————————–
जळकोट(अरुण लोखंडे):
शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही इंग्लिश मीडियम स्कूलचे आकर्षण पालकांमध्ये निर्माण झाले असून त्याचा परिणाम शासना मार्फत व शिक्षण संस्था मार्फत चालविल्या जाणाऱ्या मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी पट संख्येवर होऊन मराठी माध्यमाचा शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असून मराठी माध्यमांच्या शाळा टिकवण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी पालक आणि शिक्षक यांचीच आहे.असे प्रतिपादन पार्वती कन्या प्रशाला जळकोट चे अधक्ष महेश बंकरराव कदम यानी जळकोट येथे बोलताना केले.

पार्वती कन्या प्रशाला जळकोट ता.तुळजापूर येथे शिवजी तरुण मंडळ जळकोट व पार्वती कन्या प्रशाला च्या वतीने ७८व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष तथा पार्वती कन्या प्रशाला जळकोटचे अध्यक्ष महेश बंकटराव कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक भाऊ पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तुळजापूर,कृष्णात आण्णा मोरे तालुका उपप्रमुख शिवसेना उबाठा,यशवंतराव कदम पाटील अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती,राजकुमार पाटील चेअरमन विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटी, दत्तात्रय शिंदे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, आदी उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यक्षिय स्थानावरून महेश कदम बोलत होतो.पुढे बोलताना ते म्हणाले की इंग्लिश मेडियम शाळांच्या आकर्षणामुळे मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या झपाट्याने घटत असून पट संख्येच्या कारणावरून मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत तरी या शाळा बंद पडू नये यासाठी समाजातल्या सर्व स्तरातून प्रयत्न होणे काळाची गरज आहे.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल,थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमांचे पूजन करून आभिवादन करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्या प्रतिक्षा गोपाळ सुरवसे,पंचायत समितीच्या उपसभापती रोहीणी विवेकानंद मिलगिरी, पंचायत समिती सदस्य ॲड अशिष सोनटक्के पंचायत समिती सदस्य भिवाजी इंगोले, पंचायत समिती सदस्य सुवर्णा गुंजिटे, सरपंच गजेंद्र पाटील,
अँड.सचिन कदम,
प्रा.डॉ.रामकृष्ण कदम, प्रा.डॉ.अंकुश

कदम, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिमाशंकर हासुरे,पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय सचिव संपर्कप्रमुख अरुण लोखंडे,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या सुरेखा बालाजी माळी, ज्योती लक्ष्मीकांत पाटिल, गुनवंत विद्यार्थी ,सारंग बालाजी माळी,शौर्य करबसाप्पा धमुरे, आरोही राम सातपुते आदींचा यथोचित सत्कार करण्यात आला.

या वेळी यावेळी मुख्याध्यापिका लता सोमवंशी सहशिक्षक अभिमन्यू कदम पंडित कदम,विशाल कदम,बसवराज मडोळे, सहशिक्षिका सुजाता व्हटकर, रोहीणी तळेकर,सातपुते मॅडम, संस्थेचे सचिव ब्रम्हानंद कदम, संचालिका दिपा कदम, मुर्टा गावाच्या सरपंच सौ लोहार मॅडम,सह विद्यार्थी पालक, ग्रामस्थ,व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहशिक्षक सचिन कुमार गुड्ड यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयकुमार मोरे सर यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india