Best News Portal Development Company In India

पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुळजाभवानी मातेच्या चरणी ‘आशीर्वाद का एक दिया’!

पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी तुळजाभवानी मातेच्या चरणी ‘आशीर्वाद का एक दिया’!

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून अनोखा उपक्रम

तुळजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी आशीर्वाद का एक दिया तेवत ठेवून अनोख्या पद्धतीने दीपप्रज्वलन केले. मोदी यांना निरामय दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून देशसेवा अविरतपणे घडत राहावी, यासाठी त्यांनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना केली.

पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात विविध ‘सेवा व संकल्प’ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून तुळजापूर येथे हा दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देशाच्या प्रगतीसाठी आणि जनकल्याणासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेने पुढे जात असून, त्यांच्या हातून राष्ट्रसेवेचे कार्य अखंडपणे सुरू राहावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तुळजाभवानी मातेच्या पावन चरणी प्रज्वलित केलेला दीप हा श्रद्धा, सेवा आणि संकल्प यांचे प्रतीक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्याचा संकल्पही करण्यात आला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india