Best News Portal Development Company In India

​श्री तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर २०२६ मधील ‘सिंहासन पूजे’साठी ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार प्रक्रिया!

​श्री तुळजाभवानी देवीच्या ऑक्टोबर २०२६ मधील ‘सिंहासन पूजे’साठी ऑनलाईन नोंदणीचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरू होणार प्रक्रिया!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व इतर विविध राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक कुलधर्म आणि कुलाचार करण्यासाठी तुळजापूर येथे येत असतात. श्री तुळजाभवानी देवीची ‘सिंहासन पूजा’ ही भाविकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची व श्रद्धास्थानाची मानली जाते. आगामी ऑक्टोबर २०२६ या महिन्यातील सिंहासन पूजेच्या ऑनलाईन नोंदणीचे अधिकृत वेळापत्रक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

​भाविकांना मंदिर संस्थानच्या – https://online.shrituljabhavani.org या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपली सिंहासन पूजा नोंदवता येणार आहे.
​ऑनलाईन नोंदणी व सोडतीचे (ड्रॉ) सविस्तर वेळापत्रक-
​सिंहासन पूजा नोंदणी- १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येईल.

​प्रथम सोडत (१ली फेरी)- २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता ऑनलाईन ड्रॉ पद्धतीने पहिली सोडत काढून निवड झालेल्या भाविकांना पेमेंटसाठी SMS पाठवला जाईल.
​प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट- २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजल्यापासून ते २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पेमेंट करणे आवश्यक राहील.
​द्वितीय सोडत (२री फेरी)- पहिल्या फेरीत संख्या पूर्ण न झाल्यास २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता दुसरी सोडत काढून SMS पाठवला जाईल.
​द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट- २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पेमेंटची मुदत असेल.
​तृतीय सोडत (३री फेरी)- पहिल्या दोन फेऱ्यांनंतरही जागा रिक्त राहिल्यास २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तिसरी सोडत काढली जाईल.
​तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट- २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० ते ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेपर्यंत पेमेंट करता येईल.
​अंतिम यादी प्रसिद्धी- माहे ऑक्टोबर २०२६ मधील अंतिम बुकिंग झालेल्या भाविकांची यादी ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता (१७:०० वा.) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

​महत्त्वाची टीप (मंचकी निद्रेमुळे ‘या’ दिवशी सिंहासन पूजा बंद राहील)-
​मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात श्री देवीजींच्या मंचकी निद्रेचा काळ असल्याने खालील कालावधीत सिंहासन पूजा पूर्णपणे बंद राहतील.
​दिनांक ०४ ऑक्टोबर २०२६ ते १० ऑक्टोबर २०२६
​दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ ते २५ ऑक्टोबर २०२६

​मंदिर प्रशासनाचे भाविकांना आवाहन-
​सर्व भाविकांनी कोणत्याही मध्यस्थांवर विश्वास न ठेवता श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत https://online.shrituljabhavani.org या संकेतस्थळाला भेट देऊन वेळेत आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन), श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर (माया माने) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india