Best News Portal Development Company In India

धाराशिव: लग्नाचे अमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल!

धाराशिव: लग्नाचे अमिष दाखवून ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
लग्नाचे अमिष दाखवून एका ३२ वर्षीय महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार धाराशिव शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (ॲट्रॉसिटी) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने २१ सप्टेंबर २०२५ ते १७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या काळात आरोपीने पीडितेला मोबाईलवर मेसेज करून मानसिक त्रास दिला. तसेच तिचे छायाचित्रीकरण (फोटो/व्हिडिओ) सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

​सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने १७ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पीडितेच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध खालील कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
​भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ६४(२)(एम) (लैंगिक अत्याचार), ७५ (महिलांचा छळ), ३५२ (शांतताभंग) व ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी)
​अ‍ॅट्रॉसिटी कायदा (SC/ST Act) कलमे: ३(१)(आर), ३(१)(एस), ३(१)(डब्ल्यू)(आय), ३(१)(डब्ल्यू)(आयआय) आणि ३(२)(व्हीए)

​कायद्यानुसार पीडित महिलेची ओळख व गोपनीयता राखण्यासाठी तिचे नाव व गाव गुप्त ठेवण्यात आले आहे. धाराशिव शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. सदरील गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी शहरवासीयांची मागणी जोर करत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india