Best News Portal Development Company In India

सराटी येथे भीम गीत गायन स्पर्धेतून भिमरायाला आदरांजली.

सराटी येथे भीम गीत गायन स्पर्धेतून भिमरायाला आदरांजली
__________________________________
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड ):
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने तुळजापूर तालुक्यातील सराटी येथे भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करून भीमरायाला आदरांजली वाहण्यात आली.
मौजे सराटी ता.तुळजापूर येथे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण अभिवादन समिती च्या वतीने समाज प्रबोधनपर भीम गीत गायन स्पर्धा घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर याना यअभिवादन करण्यात आले.
या भीम गीत गायन स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातील पंचशील गायन पार्टी केशेगाव, राजरत्न गायन पार्टी दहिटणा,
न्यू अमर गायन पार्टी निलेगाव, पंचशील गायन पार्टी वागदरी, सत्यशोधक गायन पार्टी सराटी,
पंचशील गायन पार्टी चिवरी, परिवर्तन गायन पार्टी हडपसर पुणे आदी गायन पार्टीने सहभाग नोंदविला होता.
यामध्ये पंचशील गायन पार्टी केशेगाव या गायन पार्टीचा प्रथम क्रमांक आला तर न्यू अमर गायन पार्टी नेलेगाव या गायन पार्टीने द्वितीय क्रमांक पटकाविला व चिवरी येथील पंचशील गायन पार्टीने तृतीय क्रमांक मिळविला या स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या गायन पार्टीला अनुक्रमे ५००० रु,३००० रू व २००० रुपये रोख रक्कम देवून आभिवादन समितीच्या वतीने सन्मानित करण्यात आले तर सहभागी सर्व गायन पार्टीना प्रत्येकी १००० रुपये देण्यात आले.
I या स्पर्धेमध्ये अनेक अर्थपूर्ण समाज प्रबोधनपर दर्जेदार गीते सादर करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यामध्ये ” चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भिमराया” या गीताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या स्पर्धेचे परिक्षक म्हणून चंद्रशेखर कंदले, कैलास गवळी गुरुजी, बापु कांबळे गुरुजी यानी काम पाहीले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी
लिंबाजी सुरवसे,सयाजी गायकवाड,जयप्रकाश दुपारगुडे, महादेव सुरवसे,गजानन दुपारगुडे,बाळू दुपारगुडे,समर्थ सुरवसे,सुदर्शन गायकवाड,राहुल दुपारगुडे,आनंदा गायकवाड, दिलीप सुरवशे,चंद्रकांत सुरवसे, आदी सह समस्त बौद्ध बांधव ग्रामस्थांनी पुढाकार घेतला होता. या प्रसंगी तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्ते महिला ग्रामस्थ युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india