Best News Portal Development Company In India

तुळजापुरात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धडक छापा; १ लाख ११ हजारांच्या रोकडीसह मुंबईच्या एकासह ५ जण गजाआड!

तुळजापुरात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर धडक छापा; १ लाख ११ हजारांच्या रोकडीसह मुंबईच्या एकासह ५ जण गजाआड!

​तुळजापूर प्रतिनिधी :-
तुळजापूर शहर आणि परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. जुन्या हंगरगा पाटी रोडवरील कदम हॉस्पिटलच्या मागे उघड्यावर सुरू असलेल्या ‘झन्ना-मन्ना’ मटका अड्ड्यावर तुळजापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ५ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ११ हजार ५० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
​
​ही कारवाई दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ८:३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने हंगरगा पाटी रोडवर असलेल्या कदम हॉस्पिटलच्या पाठीमागे काही व्यक्ती बेकायदेशीरपणे मटका जुगार चालवत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने छापा टाकला.

​ताब्यात घेतलेले आरोपी-
​घटनास्थळावरून पोलिसांनी खालील पाच जणांना ताब्यात घेतले.
​अतुल बंडु टोले (वय ३७ वर्ष, रा. आरधवाडी गल्ली, तुळजापूर)
​सचिन आबाराव जटाळ (वय ४५ वर्ष, रा. जवाहर गल्ली, तुळजापूर)
​नागेश तुकाराम कांबळे (वय ३२ वर्ष, रा. नरीमन पॉईंट, तुळजापूर)
​गणेश लिंबाजी पांचगे (वय १९ वर्ष, रा. पापनाश नगर, तुळजापूर)
​शाम मारुती कोळी (वय ३२ वर्ष, रा. उरण, जि. मुंबई)

​मुद्देमाल व कायदेशीर कारवाई-
​पोलीस पथकाला आरोपींच्या ताब्यातून झन्ना-मन्ना मटका जुगाराचे साहित्य आणि १,११,०५० रुपये रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून, सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​या कारवाईमुळे तुळजापुरातील अवैध जुगार चालकांचे धाबे दणाणले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. परंतु कारवाया धिम्या गतीने होत आहेत आणि चिरीमिरी साठी ठराविक ठिकाणी होत आहेत. तुळजापुरातील नागरिकांतून दबक्या आवाजात अशी चर्चा आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india