Best News Portal Development Company In India

धक्कादायक! तुळजापूर मध्ये, “महिला ट्रॅप टोळी”सक्रिय; सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती नंतर लगेच त्या ठिकाणी लुट

धक्कादायक! तुळजापूरमध्ये “महिला ट्रॅप”टोळी सक्रिय; सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृतीनंतरच त्याच ठिकाणी लूट

तुळजापूर : ज्ञानेश्वर गवळी

शहरात महिलांना पुढे करून ब्लॅकमेल व लूटमार करणाऱ्या टोळ्यांचा वाढता व्याप आता गंभीर पातळीवर पोहोचला आहे. सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक पंकज शहाणे यांनी नुकतीच बायपास रोड परिसरात नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले होते. पण धक्कादायक म्हणजे, याच ठिकाणी दोन व्यक्तींना महिलांच्या ट्रॅपद्वारे लुटल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, महिलांना आमिष म्हणून पुढे करून पुरुषांना अडवणे, त्यांना ब्लॅकमेल करणे व पैशांची उकळणी करणे या पद्धतीने गुन्हेगारांकडून लूटमार सुरू आहेत. शहरात अशाप्रकारच्या सलग दोन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिकांच्या मते, अशा टोळ्या अचानक समोर येणाऱ्या महिलांमार्फत ‘प्रॉब्लेम’ निर्माण करून गोंधळ घालतात आणि त्याच गोंधळाचा फायदा घेत पीडितांकडून पैसे उकळतात.

सामाजिक कार्यकर्ते पंकज शहाणे यांनी सांगितले की, “शहरात काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली दिसत आहेत. नागरिकांनी अज्ञात महिलांशी संवाद साधताना किंवा निर्जन भागात थांबताना विशेष काळजी घ्यावी

दरम्यान, या घटनांनी तुळजापूरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून नागरिकांकडून अशा टोळ्यांवर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.

सावधान!
तुळजापूरमध्ये महिलांना पुढे करून ब्लॅकमेल, अडवणूक आणि लूटमारच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india