Best News Portal Development Company In India

तुळजापुरात ‘एसटी कॉलनी’त धाडसी घरफोडी! ३ लाख ३० हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास.

तुळजापुरात ‘एसटी कॉलनी’त धाडसी घरफोडी! ३ लाख ३० हजारांचे दागिने व रोख रक्कम लंपास.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
तुळजापूर शहरातील एसटी कॉलनी परिसरामध्ये एका बंद घराचा कडी-कोंडा तोडून अज्ञात चोरट्याने ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी कॉलनी, तुळजापूर येथील रहिवासी फिर्यादी अन्नपुर्णा सुभाषराव पांचाळ (वय ३८) या दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. यानंतर दि. १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०० ते दि. १९ सप्टेंबर रोजी रात्री ८:०० वाजेच्या दरम्यान, संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला.

​चोरट्याने घरातील कपाटाची तोडफोड व उचकापाचक करून कपाटात ठेवलेले ५६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५०,००० रुपयांची रोख रक्कम, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा माल चोरून नेला.
​
१९ सप्टेंबर रोजी रात्री घराचा कडी-कोंडा तुटल्याचे आणि घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अन्नपुर्णा पांचाळ यांनी दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

​त्यांच्या प्रथम खबरेवरून तुळजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(५), ३३१(४) व ३०५(ए) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india