Best News Portal Development Company In India

दुष्काळाच्या सावटात तुळजापूरचा ‘पर्यावरणपूरक’ गणेशोत्सव: पाचुंदा तलावातील विसर्जन टाळून ‘मूर्तीदाना’चे नगरपरिषदेचे आवाहन!

दुष्काळाच्या सावटात तुळजापूरचा ‘पर्यावरणपूरक’ गणेशोत्सव: पाचुंदा तलावातील विसर्जन टाळून ‘मूर्तीदाना’चे नगरपरिषदेचे आवाहन!

​पाण्याचा थेंब अन थेंब वाचवा, कृत्रिम हौदांचा वापर
करून गणरायाला द्या पर्यावरणाची साथ; नगराध्यक्ष विनोद गंगणे व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांचा अनोखा पुढाकार.

​तुळजापूर प्रतिनिधी:-
दुष्काळाच्या गंभीर पार्श्वभूमीवर शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे या दुहेरी उद्देशाने तुळजापूर नगरपरिषदेने यंदा एक अनोखा आणि कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. नगरपरिषदेच्या वतीने यंदा पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होऊ नयेत यासाठी नागरिकांनी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता कृत्रिम हौदांचा वापर करावा किंवा मूर्तीदान करावे, असे आवाहन नगरपरिषदेतर्फे करण्यात आले आहे.

​तुळजापूर नगरपरिषद कर्मचारी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित श्रींच्या आरतीप्रसंगी नगराध्यक्ष विनोद गंगणे व मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी उपस्थितांना हा संदेश दिला. सुरुवातीला पत्रकारांच्या हस्ते विघ्नहर्ता गणरायाची आरती मोठ्या उत्साहात पार पडली.
​
​पाचुंदा तलावात विसर्जन टाळा-
मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले की, “यंदाची दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी पाचुंदा तलावासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन न करता नगरपरिषदेने तयार केलेल्या कृत्रिम हौदांचा वापर करावा अथवा मूर्तीदान करून पाणीस्रोत वाचवावेत.”

​गणरायाच्या भक्तीसोबत पर्यावरणाची काळजी:
नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी नागरिकांना आवाहन करताना म्हटले की, “पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. गणरायाच्या भक्तीसोबतच निसर्गाचे आणि पाणीसाठ्यांचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. या गणेशोत्सवात प्रत्येकाने पर्यावरणपूरक पद्धतीचा अवलंब करावा.”
​
​या आरती सोहळ्याला नगराध्यक्ष विनोद गंगणे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्यासह उपगटनेते औदुंबर कदम, गटनेते अमोल कोतवाल, नगरसेवक सागर कदम, पंडित जगदाळे, लखन पेंदे, चंद्रशेखर भोसले, आनंद जगताप, रणजीत इंगळे यांच्यासह नगरपरिषदेचे इतर नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​तुळजापूर नगरपरिषदेच्या या ‘पर्यावरणपूरक’ आणि ‘पाणी वाचवा’ उपक्रमाचे शहरभरातून सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india