Best News Portal Development Company In India

श्री गणेश मित्र मंडळ , मुरूम गणरायाची महापूजा युवासेना मराठवाडा पक्ष निरीक्षक तथा उमरगा नगरीचे नगराध्यक्ष किरण भैय्या गायकवाड यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली.

श्री गणेश मित्र मंडळ , मुरूम गणरायाची महापूजा युवासेना मराठवाडा पक्ष निरीक्षक तथा उमरगा नगरीचे नगराध्यक्ष किरण भैय्या गायकवाड यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाली.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

( दि.२१ )महापूजेच्या निमित्ताने मंडळ परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. विधिवत पूजा-अर्चा झाल्यानंतर नगराध्यक्ष किरण भैय्या गायकवाड यांनी मंडळातील पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधत गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेतली. मंडळाकडून गणेशोत्सवानिमित्त राबविण्यात येणारे विविध सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम याबाबत त्यांनी जाणून घेतले.
उपस्थित मान्यवरांचे गणेश मंडळाच्या वतिने यथोचित सत्कार करुन सन्मान करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्ष किरण भैय्या गायकवाड यांनी मंडळातील लहान सदस्यांशीही आपुलकीने संवाद साधला. छोट्या सदस्यांसोबत गप्पा मारत त्यांनी त्यांच्या सहभागाबाबत माहिती घेतली. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारे विविध खेळ, वन मिनिट शो, डान्स, मिरवणूक तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांची त्यांनी उत्सुकतेने माहिती घेतली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लहान मुलांपासून युवकांपर्यंत सर्वांना सहभागी करून घेण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे गायकवाड बोलताना म्हणत होते.

यावेळी नगराध्यक्ष कीरण गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांशीही मनमोकळेपणाने संवाद साधला. शहरातील विविध प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा तसेच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या बाबींवर उपस्थितांशी चर्चा करण्यात आली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, संस्कृती, कला आणि समाजजागृतीचा उत्सव ठरावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मंडळाच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच गणेशोत्सव आनंददायी आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. युवकांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विधायक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असेही मार्गदर्शन करण्यात आले.

महापूजेच्या कार्यक्रमानंतर मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमामुळे मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष सिध्दु पीचे, उपाध्यक्ष आकाश श्रीरसागर, सचिव प्रशांत जाधव, श्रीकांत सुतार, अविनाश माने, प्रथमेश टिकांबरे, अप्पू टिकांबरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख मा.भगत माळी, युवासेनेचे मा.श्रावण इंगळे, विजयकुमार घोडके, आशू गायकवाड, निरंजन पुराणे, गणेश टिकांबरे, विशाल चौधरी, समर्थ साखरे, प्रशांत सुपेकर, महादेव मंडले, अनिकेत बेलमगे, वेदांत मुडे, शंकर येवले, मल्लिकार्जुन स्वामी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते सिध्दलिंग अप्पा हिरेमठ यांनी केले तर आभार समर्थ साखरे यांनी मानले.
गणरायाच्या चरणी भक्तिभाव, युवकांचा उत्साह आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे श्री गणेश मंडळाची महापूजा सोहळा अविस्मरणीय ठरला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail