लोकवर्गणीतून होतेय वृंदावन नगरात महादेव मंदिराची उभारणी !
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील वृंदावन नगर कॉलनीत लोकवर्गणीतून उभारण्यात येणाऱ्या महादेव मंदिराचे भूमीपुजन उत्साहात संपन्न !
महादेव भाविक भक्तांचे अध्यात्मिक व धार्मिक , सांस्कृतिक प्रबोधन व्हावे. यासाठी
येथील वृंदावन नगर कॉलनी परिसरात असलेल्या खुल्या जागेत या परिसरातील भाविक भक्तांच्या लोक वर्गणीतून महादेव मंदिर उभारणी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या पूर्वी याच खुल्या जागेत लोक वर्गणीतून श्री विराट हनुमान मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.
सोमवारी महादेव मंदिर उभारणीचे भूमीपूजन डॉ.डि.एस.थिटे, डॉ. लक्ष्मण सातपुते , सुशिल दळगडे ,डॉ. अनंत मुगळे आदि सह मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.डॉ. सचिन तावशीकर,डॉ. निलेश येळापूरे, ॲड. संजय बिराजदार, अनुप चिंचोळी , राजकुमार दुधनाळे, भरत चौधरी, दयानंद बिराजदार, सुधीर कुरूम, शैलेश बिराजदार,प्रा.डॉ. विलास होगाडे, बळीराम हंगरगे, संजय नागणे , प्रदीप दुधभाते, प्रदीप गावकरे, दळवी, मुरुमकर सह आदि मान्यवरांची उपस्थिती होती.
मंदिराचे बांधकाम कर्नाटक राज्यातील बांधकाम कामगारा मार्फत करण्यात येणार आहे. या मंदिर बांधकामा करीता जवळपास वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात होत असलेल्या महादेव मंदिर उभारणीस भाविक भक्तांनी सढळ हातानी मदत करावी असे अवाहन विराट हनुमान द्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.







