Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा; ११ हजार रोकड अन् चांदीची चैन भाविकाला केली सुपूर्द!

श्री तुळजाभवानी मंदिरात सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा; ११ हजार रोकड अन् चांदीची चैन भाविकाला केली सुपूर्द!

​तुळजापूर प्रतिनिधी :-
श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाच्या सतर्कतेमुळे आणि प्रामाणिकपणामुळे एका भाविकाची हरवलेली ऐवज व रोख रक्कम सुरक्षितपणे परत मिळाली आहे. मंदिर परिसरातील आरती पॉईंटजवळ कर्तव्यावर असताना सुरक्षा रक्षक स्वामी बसय्या यांना एक बेवारस पर्स आढळून आली होती.

​पर्सची पाहणी केली असता त्यात ११,९७९ रुपये रोख रक्कम आणि एक चांदी सदृश्य चैन असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षा रक्षकांनी पर्समधील कागदपत्रे व उपलब्ध माहितीच्या आधारे तातडीने शोध घेऊन संबंधित भाविकाशी संपर्क साधला. ही पर्स नातेपुते (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथील भाविक सौ. माधुरी सतीश इंगोले यांची असल्याचे स्पष्ट झाले.

​त्यानंतर आवश्यक पडताळणी करून ही रोख रक्कम आणि चांदीची चैन भाविक माधुरी इंगोले यांच्या स्वाधीन करण्यात आली. आपली हरवलेली पर्स सुरक्षितपणे परत मिळाल्याने भाविकाने मंदिर प्रशासन व सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

​या प्रसंगी सुपरवायझर कमलाकर पवार, अनिल लोखंडे यांच्यासह इतर सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते. सुरक्षा रक्षक स्वामी बसय्या यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे मंदिर प्रशासनासह सर्व भाविकांमधून कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail