Best News Portal Development Company In India

धक्कादायक! लोहारा खुर्द येथे घर अन् शेतीच्या वादातून महिलेची सुरीने भोसकून हत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल!

धक्कादायक! लोहारा खुर्द येथे घर अन् शेतीच्या वादातून महिलेची सुरीने भोसकून हत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल!

​तुळजापूर प्रतिनिधी:-
घर आणि शेती विकण्याच्या कौटुंबिक वादातून एका महिलेची लोखंडी सुरीने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना लोहारा खुर्द (ता. लोहारा) येथे घडली आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या पतीसह तीन जणांवर लोहारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास लोहारा खुर्द येथे घर व शेती विकण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसेत होऊन आरोपी पिंटु उर्फ आप्पाराव गुलाब राठोड (वय ४५), शालु गहिण जाधव आणि गहिण जाधव (सर्व रा. लोहारा खुर्द) यांनी कमल पिंटु आप्पाराव राठोड यांच्यावर लोखंडी सुरीने प्राणघातक हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात कमल राठोड यांचा मृत्यू झाला.

​पत्नीची हत्या करून पतीने स्वतःवरही केले वार
घटना घडल्यानंतर मुख्य आरोपी पती पिंटु उर्फ आप्पाराव राठोड याने स्वतःच्या पोटावर लोखंडी सुरीने वार करून घेत स्वतःलाही गंभीर जखमी केले आहे.

या प्रकरणी मयत महिलेचा मुलगा राहुल पिंटु उर्फ आप्पाराव राठोड (वय २५, रा. लोहारा खुर्द) याने २२ सप्टेंबर २०२६ रोजी लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलीस ठाणे लोहारा येथे आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास लोहारा पोलीस करत आहेत.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india