१६ ऑक्टोबरला धाराशिवमध्ये धडकणार आरपीआयचा ‘समता क्रांती मार्च’; नियोजन बैठकीत रणनीती निश्चित!
तुळजापूर प्रतिनिधी:-
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘समता क्रांती मार्च’ येत्या १६ ऑक्टोबर २०२६ रोजी धाराशिव शहरात दाखल होत आहे. या समता क्रांती मार्चच्या स्वागतार्थ आणि रॅलीच्या पूर्वतयारीसाठी आरपीआय (आठवले) पक्षाच्या धाराशिव शहर व तालुक्याची महत्त्वपूर्ण नियोजन बैठक २४ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडली.
महाराष्ट्र राज्य जॉईंट सेक्रेटरी मा. राजाभाऊ ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष मा. विद्यानंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली. १६ ऑक्टोबर रोजी शहरात येणाऱ्या समता क्रांती मार्चचे ऐतिहासिक व भव्य स्वागत करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. बैठकीत रॅलीची रूपरेषा, मार्गांचे नियोजन आणि कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्याबाबत सविस्तर चर्चा होऊन रणनीती ठरवण्यात आली.
प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष रणजीत गायकवाड, रिपब्लिकन एम्प्लॉईज जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मस्के, युवक जिल्हाध्यक्ष रणजीत बनसोडे, जिल्हा सरचिटणीस सिद्धार्थ ओहाळ, जिल्हा कार्याध्यक्ष सोमनाथ गायकवाड, युवक जिल्हा संघटक तुकाराम नागटिळक, शहराध्यक्ष महादेव भोसले, तालुकाध्यक्ष भालचंद्र कटारे, शहर सरचिटणीस सुहास झेंडे, युवक शहराध्यक्ष सूर्यनंद बनसोडे आणि शहर सचिव मुकेश मोठे हे प्रमुख उपस्थित होते.
तसेच युवक नेते अश्रुबा शितोळे, संदीप अंकुशराव, स्वप्निल लष्करे, फयाज पठाण, वैभव बनसोडे, धीरज कांबळे, तोसी बागवान, रितेश लष्करे, सुमित भिसे, मंगेश चौधरी, विकास कांबळे, सुनील माने, प्रणव सर्वदे, यशराज शिंदे, जीवनराज शिंदे, रवी विटाळे, प्रशांत आव्हाड, नितीन कांबळे, शांतीरत्न वाघमारे, सुमित लष्करे, अनिकेत गायकवाड, अनिकेत कांबळे, सुरज जाधव, मल्हारी साबळे, अमर जाधव, आप्पा लष्करे व अभिजीत लष्करे यांच्यासह पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







