माजी मंत्री तथा भाजपचे नूतन आमदार बस्वराज पाटील यांची बोधले परिवाराच्या घरी सदिच्छा भेट; बाप्पाच्या आरतीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती!
तुळजापूर प्रतिनिधी:-
भारतीय जनता पार्टीचे नूतन विधान परिषद आमदार तथा माजी मंत्री बस्वराज पाटील यांनी आज भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी बोधले परिवारातील घरगुती गणपती बाप्पाची भावपूर्ण आरती करून दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले.
या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव बोधले, शिवांकुर बोधले तसेच सौ. सुदर्शनी शिवाजीराव बोधले यांच्या वतीने आमदार बस्वराज पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात स्वागत व नागरी सत्कार करण्यात आला.
गणपती आरतीच्या या मंगलमय प्रसंगी राजकीय, सामाजिक, पत्रकारिता आणि उद्योग क्षेत्रातील अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये प्रामुख्याने-
श्री. किशोर गंगणे (माजी अध्यक्ष, पुजारी मंडळ)
श्री. सुहास साळुंके (माजी उपनगराध्यक्ष)
श्री. गुरुनाथ बडूरे (प्रसिद्ध व्यावसायिक व पत्रकार)
श्री. प्रकाश अस्टे (भाजप जिल्हा उपाध्यक्ष, उमरगा)
श्री. सचिन पाटील (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती)
श्री. लखन पेंदे (नगरसेवक)
श्री. बाळासाहेब भोसले (माजी व्हाईस चेअरमन, खरेदी-विक्री संघ)
श्री. धैर्यशील दरेकर
श्री. ज्ञानेश्वर पांडागळे (सरपंच, मोर्डा)
श्री. कृष्णा साळुंके (तालुका सरचिटणीस)
श्री. धनंजय पाठक
श्री. विक्रम माडजे
श्री. कुबेर जाधव
यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाप्पाच्या आरतीनंतर अत्यंत आपुलकीच्या आणि स्नेहाच्या वातावरणात उपस्थितांमध्ये संवाद रंगला. आमदार बस्वराज पाटील यांच्या या भेटीमुळे बोधले परिवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.







