ग्रामपंचायत जळकोट च्या कामाची चौकाशी लागताच जळकोट ग्रामपंचायतने केले कचराकुंड्याचे वाटप .- – – – – – – – – – – – – – – – – – –
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड आशिष सोनटक्के यांनी केली चौकाशीची मागणी
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट ग्रामपंचयात मध्ये चौदा आणि पंधरा वित्त आयोग व अन्य कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या कामाची चौकाशी व्हावी या कामी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी याना निवेदन दिले असता कचराकुंड्याचे वाटप करण्यात आले .
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट ग्रामपंचायत मध्ये विविध कामांमध्ये भ्रटाचार झाल्याचे विद्यामान उपसंरपंच प्रशांत नवगिरे यांनी दिनांक ५ डिसेंबर रोजी वरिष्ठाकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केले असता ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभार बदल बातम्या प्रकाशित झाल्या आणि हा विषय चव्हाट्यावर आला आणि गावात चर्चेला उदान आले संबंधीत भ्रष्टाचार झाल्याचे सत्तेत असणाऱ्या उपसंरपंचानेच हा घोळ जनतेसमोर आणल्याने विद्यामान संरपंचने दि . ८ डिसेबर रोजी विशेष सभा बोलवून झालेल्या आरोपाचे खंडण करण्याचा जनेतसमोर प्रयत्न ही केला आहे मात्र हा आरोप विरोधकांनी केला नाही तर त्यांच्याच पॅनेलच्या विद्यामन उपसंरपंचाने केल्याने जनतेत सभ्रम निर्माण झाला . हा विषय चार वर्षात विरोधकांनी एखदाही केला नाही . मग नेमकं अस काय घडलं की विद्यमान उपसंरपंचास हा घडलेला ग्रामपंचायतीच्या घोळ बाहेर का काडावा लागला हा विषय महत्वाचाच आहे . मग या विषयी बाबत नेमकं काय घडलं ते माहिती घेण्याच्या अनुषगाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेरमन ॲड आशिष सोनटक्के यांनी दिनांक ९ डिसेबर २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना जळकोट ग्रामपंचायत मध्ये झालेल्या कामातील भ्रटाचारा संदर्भात निवेदन देवून या प्रकरणी रितसर चौकाशी होऊन संमधीत सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर कार्यावाही व्हावी अशी मागणी केली व या संदर्भात २३ डिसेबर रोजी पत्रकार परिषद घेवून जळकोट ग्रामपंचायतीच्या झालेल्या कामातील गैरव्यवहारा बाबत पत्रकारांना सविस्तर माहिती दिली . आणि या संदर्भात प्रसार माध्यमातून व्रत प्रकाशित होताच ग्रामपंचायतने आपली आता नामुष्की जावू नये म्हणुन आम्ही किती पारदर्शक कारभार करित अहोत हे दाखविण्यासाठी फायबर मुतारी कचराकुंडी खरेदी केली आहे व चौकाशीची धास्ती घेवून दिनांक २६ डिसेबर रोजी कचरा कुंड्याचे नागरीकांना वाटप करण्यात आले आहे पण सर्व गोष्टीसाठी एवढा विलंब का लागला व झालेल्या गैरव्यवहारा बाबत मुखकार्यकारी अधिकारी साहेब यांनी पंचायत समिती चे गटविकास आधिकारी यांना चौकाशीचे आदेश दिले असता चौकाशी आधिकारी म्हणुन विस्तार आधिकरी नडगिरे याची नियुक्ती केली असून त्यांनी ग्रामपंचतला भेट दिल्याचे समजते . जळकोट येथील नागरीकांतून चौकाशी काय होणार याकडे लक्ष लागले आहे दोषीवर कार्यवाही होणार का? यावर पडदा पडणार .






