Best News Portal Development Company In India

नंदगाव जिल्हा परिषद गटात विकासाचे कमळ फुलले!

नांदगाव जिल्हा परिषद गटात विकासाचे कमळ फुलले
———————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड) :
नुकतच पार पडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तुळजापूर तालुक्यातील नंदगाव गट आणि दोन्ही गणातील भाजपा आरपीआय (आठवले),शिवसेना (एकनाथ शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार ) व मित्र पक्ष महायुतीचे भाजपाचे अधिकृत उमेदवार विजयी झाले असून या गटात विकासाचे कमळ फुलले आहे.
. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्य कुशल लाडके आमदार राणाजगजीतसिंह पाटील उर्फ राणा दादा यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते सिद्धेश्वर कोरे उर्फ सिद्धू अण्णा यांनी कमळ या चिन्हावर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली होती याच गटांतर्गत येणाऱ्या पंचायत समिती नंदगाव गणातून भाजपाच्या सौ. रोहिणी विवेकानंद मिलगिरी तर खुदावाडी गणातून भाजपाचे भिवाजी इंगुले यांनी ही कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती.या निवडणुकीचा निकाल दिनांक ९ फेब्रुवारी २o२६ रोजी लागला असून या निवडणुकीत नांदगाव गट आणि गणातील भाजपाचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत त्यांच्या या विजयाबद्दल नळदुर्ग येथे रिपाइं सह भाजपा महायुतीच्या वागदरी,येडोळा, लोहगाव नळदुर्ग येथील कार्यकर्त्यांनी नळदुर्ग बसस्थानकासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर संविधान चौकात जंगी स्वागत करून विजय उमेदवार सिद्धू अण्णा कोरे भिवाजी इंगोले आणि सौ रोहिणीताई मिलगिरी यांचा सत्कार केला.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india