Best News Portal Development Company In India

आदर्श महाविद्यालयात ए.आय. राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ! उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.

आदर्श महाविद्यालयात ए.आय. राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न !
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व आदर्श महाविद्यालय उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवार दि. १० मार्च रोजी आंतरराष्ट्रीय ए. आय. कार्यशाळा घेण्यात आली. या ए. आय . अर्थात कृत्रिम बुद्धीमता साधनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन सक्ष्मीकरण व्हावे या साठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे उद्घाटन श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामकृष्णपंत खरोसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाचे विद्यापीठ प्रमुख तथा अध्यक्ष प्रा. डॉ. रमेश चौगुले, प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, प्राचार्य डॉ. राम सोलंकर , आदर्श महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. रमेश चौगुले म्हणाले कि – गेल्या पंधरा वर्षा पासून आपल्या देशात अधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात सर्वांगीण विकासाच्या संकल्पना पुढे येत आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्याने नवीन शैक्षणिक धोरण स्वीकारले आहे. शाळा महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आता शिक्षण क्षेत्रात नव्यानेच ए. आय. अर्थात आर्टिफिशल इंटालिजम – म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता हि संकल्पना रूढ झाली आहे.ए.आय चा शैक्षणिक क्षेत्रात सकारात्मक प्रकारे वापर केल्यास शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्रेरणा मिळणार आहे.ए.आय . चा वापर कितपत करायचा हे ऐच्छीक असले तरी ए.आय.चा अवश्यकते प्रमाणे वापर केल्यास फायद्याचे ठरणार आहे. प्रगत देशांनी ए .आय. उपयोग गेल्या दहा वर्षा पासून करायला सुरुवात केली आहे. आपल्या देशात ए.आय. गरजे पुरता वापर करावा असे अवाहन प्रा.डॉ . चौगुले यांनी केले.
कृषि , शिक्षण , आरोग्य , पोलीस प्रशासन , परिवहन , संशोधन या विविध क्षेत्रात ए.आय.तंत्रज्ञानाचा वापर सुरु झाला आहे . सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान उपयोगात आले तर मानवी बौद्धीकतेचे काय होणार शिवाय शिक्षण क्षेत्रात ए. आयचा अति वापर झाला
तर शिक्षकांच्या नौकऱ्या धोक्यात येण्याची भिती प्राचार्य डॉ. सोलंकर यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर यांचेही भाषण झाले.
ए. आय . कार्यशाळेचा समारोप संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या वेळी प्रा.डॉ. अश्वीन रांजणीकर, प्रा. डॉ. स्वप्नील कुलकर्णी, प्रा. डॉ. शिवपुत्र कनाडे, प्राचार्य डॉ. राम सोलंकर , प्रा.डॉ. श्रीकांत चव्हाण यांनी ए .तंत्रज्ञानाचे फायदे तोटे या बाबत सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजूंचे स्पष्टिकरण केले.
अध्यक्षीय समारोप प्रसंगी विनायकराव पाटील म्हणाले कि – ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर अवश्यक व काळजीपूर्वक होणे गरजेचे आहे. ए.आय.तंत्र ज्ञानाचा अति वापर झाल्यास मानवी मेंदू भ्रष्ट होण्याची शक्यता असत्याची भिती त्यांनी व्यक्त केली.ए. आय तंत्रज्ञानाचा उपयोग माणसं उद्धवस्थ करण्यासाठी होऊ नये. या तंत्रज्ञानाचा उपयोग समाज हितासाठी अवश्य झाला पाहिजे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ए .आय . चा वापर अवश्यकते प्रमाणे करावा. या तंत्रज्ञानाचा अति वापर करून आपली बुध्दीमत्तेचे नैसर्गिक कौशल्य हरवू नका असे अवाहन पाटील यांनी केले. प्रास्ताविक व सुसंचलन या कार्यशाळेचे आयोजक सचिव प्रा. डॉ. सुधीर मठपती व प्रा.डॉ. धनंजय मेनकुदळे यांनी केले. आभार प्रा.डॉ. तानाजी पवार व प्रा. डॉ. बालाजी मोरे यांनी मानले. या कार्यशाळे साठी श्रमजीवी अध्यापक महाविद्यालयव श्रमजीवी फॉर्मशी आदर्श महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राध्यापक यांची मोठ्या संख्येनि उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india