Best News Portal Development Company In India

पोलिस प्रशासनाकडून शेतकऱ्यावर होणारा अन्याय थांबवा या मागणीसाठी नळदुर्ग पोलीस ठाणे समोर शेतकरी संघर्ष समितीचे अन्नत्याग आंदोलन संपन्न !

पोलिस प्रशासनाकडून शेतकऱ्यावर होणारा अन्याय थांबवा या मागणीसाठी नळदुर्ग पोलीस ठाणे समोर शेतकरी संघर्ष समितीचे अन्नत्याग आंदोलन संपन्न!
———————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
पोलीस बळाचा गैरवापर करत शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या गुत्तेदारावर संबंधित पोलिस अधिकारी व महसूल प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून शेतकऱ्यावर होणारा अन्याय थांबवावा या मागणीसाठी नळदुर्ग ता. तुळजापूर येथील पोलीस ठाण्यासमोर शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५२ या रोडचे काम सन२o१२ पासून सुरू करण्यात आले होते परंतु शेतकऱ्याला विचारात न घेता शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीचा मावेजा न देता या कामाला संबंधित गुत्तेदारांनी सुरुवात केली होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून गेल्या दहा पंधरा वर्षापासून या रोडसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा द्यावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते.परंतु शेतकऱ्याच्या मागणीकडे सातत्याने शासन गुत्तेदार प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ करून सध्या संभाजीनगर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात या रोडचे काम न्यायप्रविष्ठ करण्यात आले असून जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत या रोडचे कसल्याही प्रकारचे काम किंवा मोजणी वगैरे करू नये ही शेतकरी संघर्ष समितीची मागणी असताना व प्रकरण न्याय प्रविष्ट असताना संबंधित गुत्तेदार आणि काही अधिकारी पोलीस बळाचा गैरवापर करून संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाराच्या तोंडी आदेशावरून शेतकऱ्यावर दबाव टाकून या जमिनीचा मोजमाप घेत असताना शेतकऱ्यांनी त्याना मज्जाव केला असता शेतकऱ्यावर गंभीर गुणे दाखल करण्यात येईल असा दबाव टाकण्यात येत आहे. या रोड मध्ये ज्याची जमीन गेली ते शेतकरी सध्या अशा या मनमानी कारभाराचे बळी पडत असून त्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे.शासन आणि प्रशासनाचा नाहक अन्याय शेतकऱ्यावर होताना दिसतो आहे. तेंव्हा हा शेतकऱ्यावर होणारा पोलीस प्रशासनाचा अन्याय थांबवावा व जोपर्यंत या रोडचा निकाल लागत नाही तोपर्यंत या रोडवर शासनाने प्रशासनाने आणि गुत्तेदाराने पाय ठेवू नये अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने करून नळदुर्ग पोलीस ठाण्यासमोर या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक प्रदीप जोशी. जिल्हा अध्यक्ष सरदारसिंग ठाकूर, तुळजापूर तालुका अध्यक्ष व्यंकट पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे महादेव बिराजदार,पंडित पाटील,अशोक पडोळे, संतोष फडतरे,गुलाब शिंदे,महेश घोडके,आजमोदीन शेख, बालाजी ठाकूर,लक्ष्मण निकम,नानासाहेब पाटील खंडू हलकंबे, रहमान शेख, काशिनाथ काळे,तोलू पटेल, बंडू मोरे,पंडित निकम, प्रतापसिंह ठाकुर श्रीकांत पोतदार, पिरपाषा इनामदार, गणपत सुरवसे सह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते या प्रसंगी नळदुर्ग नगर परिषदेचे विरोधी पक्ष घटनेचे मारुती खारवे मारुती कारवे नगरसेवक सुधीर पोद्दार महिला कार्यकर्त्या कल्पनाताई गायकवाड सुभद्राताई मुळे रिपाइं .।(आठवले) चे जिल्हा सचिव एस.के. गायकवाड, तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे सह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनास भेट दिली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india