Best News Portal Development Company In India

जळकोट येथे कल्याण मुंबई श्रीदेवी मटका जोरात युवा पिढी कोमात बुकीवाला जोमात !

जळकोट येथे कल्याण मुंबई श्रीदेवी मटका जोरात युवा पिढी कोमात बुकीवाला जोमात

– – – – – – – – – – – – – – – – – – – –

नळदूर्ग करानी हाणुन लावलं

अन जळकोटला दुकान थाटलं

– – – – – – – – – – – – – – – – – – –

बूकीवला हा एका राजकीय पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी आहे

– – – – – – – – – – – – – – – – – – – –

जळकोट ( अरुण लोखंडे) हैद्राबाद मुंबई राष्ट्रीय महामार्गावार असलेल्या जळकोट गावामध्ये सदया अवैद्य कल्याण मुंबई श्रीदेवी मटका जोरात चालू असून या मध्ये अनेक तरुण पिढी कर्जबाजारी

होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .

याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट हे गाव राष्ट्रीय महामार्ग ६५ वर वसलेले चौदा पंधरा हजार लोकवस्तीचे गाव असून गावाला मोठी बाजार पेठ आहे प्राथमिक शाळा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आहे यामुळे अनेक गावाचे तरुण विद्यार्थी शिक्षण घेण्याकरिता येत असतात गावाला मोठी बाजारपेठ असल्याने रोज पन्नास गावाचे लोक मार्केटिंग साठी येत जात असतात शनिवारी तर या भागातला सर्वात मोठा आठवडी बाजार भरत असतो . लोक बाजार च्या निमित्ताने आले की, काहीजण तर या मटका बुकीवर जावून बाजाराला आणलेले पैसे या खेळामध्ये घालतात आणि रिकाम्या हाताने घराकडे जातात या मुळे घरातील मुला बाळाना उपासमारीला सामौर्य जावे लागते अनेकांचे संसार यामध्ये उदवस्त झाले आहेत

मुंबई कल्याण श्रीदेवी नावाचा बुकी चालणार हा यापूर्वी नळदूर्ग येथील जगताप नगर मध्ये ऑफीस चालू करून हा धंदा चालू केला होता तेथील नागरीकांनी त्याला विरोध केला प्रसारमाध्यमांनी त्यावर आवाज उठविला असता तो तेथील धंदा बंद करून आता तो त्याचे बस्तान जळकोट मध्ये राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एस बी आय वंक्रागी शाखेच्या खालच्या बाजूला आपले दुकान थाटाला असून जळकोट आणि परिसरातील तरुण या खेळाच्या अहारी गेल्याने अनेक तरुण बरबाद होऊन व्यसनाधिन झाल्याचे चित्र गावामधे पहावयास मिळत आहे . बुकी चालवणारा हा सदया देशात राज्यात आणि जिल्ह्यांत एक नंबर ठरलेल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजते सदया निवडणुका संपल्या असून आता या आखाड्यात पुढारी उतरला आहे . नळदुर्ग करानी उठाव करून तेथून हाकलून दिल्याने कल्याण मंबई आणि श्रीदेवीला घेवून आता तो जळकोटला आला असून बरेच जण श्रीदेवीच्या प्रेमात पडून कंगाल झाले व श्रीदेवीला घेवून आलेला मालक मात्र माला माल झाला असून त्यांच्यावर तालुक्याच्या बड्या नेत्याचा वारदस्त आर्शिवाद असल्याने पोलीस प्रशासनाचे याच्याकडे दुर्लक्ष होत आहे काय असाही प्रश्न जनतेला पडलेला आणि येथील सुजान नागरीकाची मागणी आहे की नळदुर्ग हून घेवून आलेलं दोन नंबरच पार्सल कल्याण मुंबई श्रीदेवीला परत तिकडंच पाटवावी अशी मागणी होत आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india