Best News Portal Development Company In India

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त उमरग्यात अभिवादन उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त उमरग्यात अभिवादन

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उमरगा च्या वतीने दिनांक २० मार्च २०२६ रोजी सकाळी दहा वाजता विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद उमरगा येथे महाड चवदार तळे सत्याग्रह ९९ वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा संघटिका विद्याताई कांबळे, तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, तालुका कोषाध्यक्ष सोनाली ताई कांबळे, तालुका सचिव उषाताई गायकवाड, समता सैनिक दलाच्या सैनिक रेखाताई कांबळे, तालुका सचिव किरण कांबळे, तालुका संघटक हनुमंत कांबळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलत असताना उमरगा तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील पहिला सत्याग्रह पाण्यासाठी महाड येथील चवदार तळे येथे करून या देशांमधील नागरिकांसाठी येथील हिंदू देवतांच्या नावावरती परिस्थितीने मागास असलेल्या नागरिकांचा छळ केला जातोय त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी असूनही ते वापरता येत नाही अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ रोजी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये महाड शहरातील नगर परिषदेच्या जवळ असलेल्या चवदार तळ्यावरती तळे सर्वांसाठी खुले करावे यासाठी तीव्र आंदोलन केले सत्याग्रह केला आणि तेव्हापासून सर्वसामान्य मागास असलेल्या नागरिकांसाठीच नव्हे तर बहुजन समाजासाठी हे तळे खुले करण्यात आले.

महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी व समाजाच्या संरक्षणासाठी समता सैनिक दलाची स्थापना १९ मार्च १९२७ रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी केली. पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभा. समाज सेवा संघ. इम्प्रूमेंट ट्रस्ट. समता सैनिक दल,पीपल्स एज्युकेशन सोसायटी. स्वातंत्र्य मजूर पक्ष. शेडूल्ड कॉस्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वर्तमानपत्रांमध्ये समता प्रबुद्ध भारत बहिष्कृत, मूकनायक, जनता, भारतीय बौद्ध महासभा तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी मागास समाजासाठी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी सोलापूर बेळगाव या ठिकाणी वसतिगृहाची सुरुवात केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील नागरिकांना मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर एक हक्काची जागा म्हणून त्यांना उपलब्ध राहावी यासाठी इम्प्रूमेंट ट्रस्टच्या माध्यमातून आंबेडकर भवन या ठिकाणी जागा घेऊन त्यावरती बांधकाम केले होते ते सध्याचे आंबेडकर भवन आहे. तसेच बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून औरंगाबाद येथे विविध विभागाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची सोय विद्यार्थ्यांसाठी केली आहे, तसेच मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज ची स्थापना करण्यात आलेली आहे ते आजही कार्यरत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी १ जानेवारी १८१८ भीमा कोरेगाव चा संघर्ष याविषयी सविस्तर माहिती घेतल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनाही वाटायचे की आपले एक स्वतःचे सैन्य असले पाहिजे जे की समाजासाठी आपले बलिदान देऊ शकतील तसेच समाजाचे संरक्षण करू शकतील म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी १९ मार्च १९२७रोजी या समता सैनिक दलाची स्थापना केली पुढे चालून ते समता सैनिक दल बाबासाहेब आंबेडकरांनी १९५५ रोजी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून समता सैनिक दलाची फळी संपूर्ण देशांमध्ये उभा करण्याचे काम सुरू केले आहे.
संपूर्ण देशामध्ये आज कोणता सैनिक दल काम करत आहेत येणाऱ्या २०२७ मध्ये उमरगा तालुक्यातील २०० समता सैनिक निर्माण करण्याचे उद्दिष्ट भारतीय बौद्ध महासभेने दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या महिन्यांमध्ये आपण समता सैनिक दलाचे हे उद्दिष्ट पूर्ण करून बाबासाहेबांना अभिवादन करायचे आहे असे मत व्यक्त केले.

बाबासाहेब आंबेडकरांनी जर का १९२७ मध्ये हे आंदोलन केले नसते तर कदाचित आम्हाला आजही पाण्यासाठी भटकंती करावी लागली असती आज सर्व समाजातील नागरिकांना तसेच भारत देशातील अनेक जातींना एकसंघ ठेवून सर्वांना मुबलक पाणी व भारतीय संविधान अधिकाराच्या माध्यमातून सर्वांना समान न्याय देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे या देशातील एक दोन जाती सोडल्या तर सर्वांसाठीच भारतीय संविधान हे वरदान ठरले आहे.
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारच महाड चवदार तळे सत्याग्रहापासून याच क्रांती भूमीतून मिळालेला आहे.त्यामुळे हे आंदोलन जगातील सर्वश्रेष्ठ शक्तीदायक आणि कोणतेही आंदोलन करताना मार्गदर्शक भूमिका समजून घेण्यासाठी हा सत्याग्रह डोळ्यासमोर ठेवला जातो.
समाजाच्या कोणत्याही घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अनेक आंदोलने होत असताना दिसून येत आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला महत्वपूर्ण अधिकार दिलेले असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या अधिकारासाठी लढण्यामध्ये व्यस्त आहे त्यामुळे भारतीय संविधानातील अनेक कायद्यांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न येथील मनुवादी विचारसरणीचे लोक लोकसभा च्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून करत आहेत.
याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हुकूमशाही कधीही आली आहे हे कोणालाही समजणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आसे मत बौध्दाचार्य उमेश सुरवसे यानी व्यक्त केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india