Best News Portal Development Company In India

समता सैनिक दलाचे सैनिक उद्धव गायकवाड यांचे दुःखद निधन !

*समता सैनिक दलाचे सैनिक उद्धव गायकवाड यांचे दुःखद निधन*

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.
भारतीय बौद्ध महासभा संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,द्वितीय अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर, तिसऱ्या अध्यक्षा तथा सरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीश रावलिया, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार प्रचार व बौद्ध बांधवांचे संरक्षण याची बांधणी करणारा समता सैनिक दल जिल्हा शाखा धाराशिव तसेच तालुका शाखा उमरगा येथील समता सैनिक दलाचे सैनिक कालकथीत उद्धव लक्ष्मण गायकवाड यांचे दिनांक २७ मार्च २०२६ रोजी रात्री दहाच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले होते.

दिनांक २७ मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्यावरती त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा उमरगा अंतर्गत समता सैनिक दलाच्या वतीने त्यांच्या पार्थीवाला तालुकाध्यक्ष कंपनी कमांडर तथा बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते समता सैनिक दलाच्या नियमाप्रमाणे पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. व अखेरची जनरल सलामी देऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजश्री कदम, जिल्हा सरचिटणीस, जिल्हा सघटक ब्रम्हानंद गायकवाड, केंद्रीय शिक्षक तथा बौध्दाचार्य बाळासाहेब बागडे गुरुजी, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, तालुका सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे, कोषाध्यक्ष सोनाली ताई कांबळे, तालुका उपाध्यक्ष महिला प्रमुख सुरेखा कांबळे, तालुका सचिव उषाताई गायकवाड,ज्योती काबळे तुळसाताई गायकवाड,किरण कांबळे, लोहारा तालुका अध्यक्ष दीपक सोनकांबळे,तालुका उपाध्यक्ष सरक्षण विभाग असिस्ट डिव्हिजन आफिसर,आम्रपाली गौतसुर्वे, सैनिक सिताताई सोनवणे,सुरेखा काबळे, प्रदीप काबळे, माजी तालुकाध्यक्ष सतोष सुरवसे, माजी पदाधिकारी राजेद्र सुर्यवशी, रोहीत वाघमारे,अविनाश भालेराव, निखिल गायकवाड, अरविद गायकवाड, उमरगा तालुक्यातील सर्व भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दलाचे सैनिक याची मोठी उपस्थिती होती.
कालकथीत उद्धव लक्ष्मण गायकवाड यांनी समता सैनिकाला मध्ये कर्तव्यदक्ष राहून संस्थेच्या नियमाचे पालन केले होते त्यामुळे ते कायमस्वरूपी संस्थेच्या वर जिल्ह्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये त्यांचे कायमची जागा असणार असल्याचे मत बोलत असताना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. उद्धव गायकवाड आदरप्रिय व्यक्तिमत्व तसेच समता सैनिक दलाने उपस्थित राहण्याचे आवाहन केल्यानंतर आवर्जून उपस्थित राहणारे सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या दुःखामध्ये भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव तालुका शाखा लोहारा यशाचा त्यांच्या दुःखामध्ये सहभागी असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली जावई नातू असा मोठा परिवार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india