दि.30 मार्च 2026
कामगार कार्यक्रम.
दि.31मार्च 2026
फेरीवाला मुद्यावर आंदोलन.
दि. 1एप्रिल 2026
अट्रॉसिटी मुद्यावर आंदोलन.
दिनांक 30 मार्च 2026 :डोंबिवली, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या पर्यत्नाने 250 नाका कामगारांना अत्यावश्यक सुरक्षा संच ( सेफ्टी किट ) मा.राजेश मोरे साहेब (आमदार कल्याण ग्रामीण विधानसभा), मा.अनघा क्षीरसागर सहाय्यक कामगार आयुक्त, कल्याण विभाग यांच्या उपस्थितित मान्यवर,नगरसेवक, व संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या हस्ते सुरक्षा संच वाटप करण्यात आले.
सत्यशोधक चळवळ पासून संविधान पर्यंत इतिहास दिपक भालेराव यांनी मांडला.
मुख्य आयोजक मा.लक्ष्मण मिसाळ (अध्यक्ष: महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना ) होते,
दिघे हॉल,गांधी नगर डोंबिवली (पूर्व) येथे कार्यक्रम पार पडला.
————————-
दिनांक 31मार्च 2026 डोंबिवली :कष्टकरी होकर्स व भाजी विक्रेता युनियन च्या वतीने आज *’ फेरीवाला मोर्चा ‘* काढण्यात आला मा.बबन कांबळे,मा.भाऊ पाटील,मा. आशाताई मगरे इतर सर्व जबाबदार नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्या पर्यंत मुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका चे ग आणि फ चे वार्ड ऑफिसर उपस्थित होते,शांततेत मोर्चा झाला, मोर्चा मध्ये महेश भोईर (कल्याण), मनीषा ताई टाकळकर (कल्याण )उपस्थित होते, ” फेरीवाला कायदा 2014 ची अंमलबजावणी झाली ” नाही तरं पुढे आणखीन मोठ्या संख्या ने मोर्चा निघेल अशी ग्वाही मोर्चा मधील जबाबदार नेतृत्व यांनी केली.✍️दिभा
———————
दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी,डोंबिवली : तलवार आणि चाकूने हल्ला करणारे! अट्रॉसिटी गुन्हातील आरोपीना तात्काळ अटक करावी सह इतर मागणीसाठी एसीपी कार्यावरती मोर्चा काढण्यात आला!
मोर्चा फुले नगर मधून निघाला सम्राट अशोक चौक मार्ग द्वारका हॉटेल समोर डोंबिवली (पश्चिम) येथे मोर्चा चे समारोह झाले.
सहायक पोलीस आयुक्त (डोंबिवली विभाग)मा. सुहास हेमाडे सर यांनी बाकी आरोपीला अटक करण्याची आश्वासन शिष्टमंडळाला देण्यात आले.
सर्व पक्षीय आजचे आंदोलन होते, नेतृत्व :रेखाताई कुरवारे (वंचित बहुजन आघाडी),नरसिंग गायसमुंद्रे ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष ), दिपक भालेराव,सुधीर सावंत,वैशालीताई कांबळे, ज्योती सुरवसे,दत्ता सावने, दिलीप काउतकर,विजय शेळके, राजू खरात, योगेश मोरे, सागर खिल्लारे, कबीर धबाले, तथागत खिल्लारे, राहुल धबाले, उपस्थित होते.
डोंबिवली मध्ये सर्व जाती समूहाचे लोकांनी बंधू भावाने एकत्र राहायला पाहिजे, असा आशावाद संदेश मोर्चाचे नेतृत्व करणारे मा.नरसिंग गायसमुंद्रे यांनी वेक्त केला.
पोलीस प्रशासनाने डोंबिवली मध्ये भविष्यात दादागिरी मधून गंभीर प्रकरण होणार नाही त्या साठी प्रतिबंधक उपयोजना करण्यात यावे आंदोलकानी मागणी केली.
जय भीम! जय मूलनिवासी! जय भारत!








