Best News Portal Development Company In India

पुस्तकोपहार–2026” : ज्ञानदानातून वृक्षसंवर्धनाचा संदेश – केन्द्रीय विद्यालय नांदेडची अभिनव पहल ! उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

*पुस्तकोपहार–2026” : ज्ञानदानातून वृक्षसंवर्धनाचा संदेश – केन्द्रीय विद्यालय नांदेडची अभिनव पहल*

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

पी.एम.श्री.केन्द्रीय विद्यालय द.म.रे. नांदेड येथे “पुस्तकोपहार–2026” या अभिनव उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. ता.27 मार्च रोजी आयोजित या कार्यक्रमाने केवळ ज्ञानदानाचाच नाही तर पर्यावरण संवर्धनाचाही प्रभावी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपली वापरून झालेली पाठ्यपुस्तके,संदर्भ पुस्तके आणि इतर उपयुक्त पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्याचे आव्हान करण्यात आले. “ज्ञान हेच सर्वात सुंदर उपहार” हा संदेश या कार्यक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.विद्यालयात इयत्ता 1 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या जुन्या पण चांगल्या स्थितीत असलेल्या पुस्तकांचे संकलन करून शिक्षकांकडे जमा केले.ही पुस्तके पुढे गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत.या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ पुस्तकदान नसून वृक्ष संवर्धनालाही चालना देणे हा आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) च्या अहवालानुसार एक टन कागद तयार करण्यासाठी सुमारे 24 झाडे तोडावी लागतात त्यामुळे वापरलेल्या पुस्तकांचा पुनर्वापर केल्यास मोठ्या प्रमाणावर झाडांची बचत होऊ शकते.मागील वर्षी विद्यार्थ्यांनी हजारो पुस्तके दान करून शेकडो झाडे वाचवण्यास हातभार लावला होता तसे यावर्षीही या उपक्रमातून पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वपूर्ण योगदान अपेक्षित आहे.
विद्यालयाचे प्राचार्य श्री.अशोक विश्वकर्मा यांनी सांगितले की, “पुस्तकोपहार हा केवळ एक उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये दानशीलता, सहकार्य आणि पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण करणारी एक सुंदर परंपरा आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने या उपक्रमात सहभागी व्हावे.”
मुख्याध्यापक श्री.राम श्रृंगारे यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, “विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या पुस्तकांचा योग्य उपयोग करून इतरांना मदत करणे ही खऱ्या अर्थाने शिक्षणाची किमया आहे आणि यामुळे ज्ञानाची साखळी अखंडित राहते.”कारण पुस्तके ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत.पुस्तकदाना मुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळते,वाचन संस्कृतीला चालना मिळते,संसाधनांचा पुनर्वापर होतो व पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.विद्यालय परिवाराने सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आव्हान केले आहे. “आपले ज्ञान इतरांसोबत वाटा,जुनी पुस्तके दान करा आणि पर्यावरणाचा मित्र बना” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.मितेश हनवते यांनी केले व सर्व शिक्षकांच्या समन्वयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करून मोठ्या प्रमाणावर पुस्तक संकलन घडवून आणले. “पुस्तकोपहार– 2026” हा उपक्रम शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणप्रेम यांचा सुंदर संगम ठरत असून विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करणारा ठरत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india