Best News Portal Development Company In India

उमररगा तालुक्यात वृक्ष तोड जोमात आणी वन विभाग व महसुल विभाग कोमात. (भाग १)

उमररगा तालुक्यात वृक्ष तोड जोमात आणी वन विभाग व महसुल विभाग कोमात.
(भाग १)
उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील ग्रामीण भागासह सर्वत्र घरगुती गँस वितरण तुटवडा झाल्याने लाकडांचा चुलीसाठी वापर वाढल्याने बहुतांश गावामध्ये फळांचे, अंबा,चिंच, जाभुळ,बोर,आदि सर्वच झाडांची विनापरवाना (कापणी )तोड जोमात सुरु असताना ,वन परिमंडळ अधिकारी देशमुख मात्र याकडे झाडे तोडणार्या व्यापाऱ्यांकडुन हप्ते वसुली करुन डोळे झाक करीत असल्याचे विदारक चित्र स्पष्ट निर्माण झाले असुन महाराष्ट्र शासनाकडुन एका बाजूने पर्यावरण वाचविण्यासाठी वर्षाकाठी लाखो करोडो रुपये खर्च करीत असताना दिसुन येत आहे तर नापीक निसर्गाच्या कोपाने हतबल झालेल्या शेतकरी मात्र शासनाच्या विना परवाना झाडे विक्री करून उदरनिर्वाह भागविण्यासाठी लाकुडतोड व्यापाऱ्यांना झाले कवडीमोल किंमतीत विकत असतो व ते लाकुड उमरगा तालुका हा कर्णाटक सिमेलगत असल्याने कर्णाटकात धाकटेवाडी चेकपोस्ट चुकवून अन्य मार्गाने व्यापारी यांच्या हीकमतीने वाहतुक केली जात आहे व कांही लाकुड उमरगा येथील औध्योगीक वसाहतीत बाँयलरसाठी पुरवठा होत असताना वनपरिमंडल अधिकारी देशमुख मुग गीळुन गप्प का आहेत हा ही प्रश्न जनतेसमोर उद्भवत आसुन कांही गरीब लाकुडतोड व्यापार्यावर व वहान मालक,चालक यांच्यावर मार्च अखेर च्या नावाखाली जुजबी कार्यवाही झाल्याचे व करीत असल्याचे वनपरिमंडल अधिकारी कागदोपत्री मेळ घात असले तरी औध्योगीक वसाहतीत बाँयलर साठी दिवसा ठवळ्या जणार्या वहानावर वनपरिक्षेत्र विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हप्ते वसुलीसाठी सलाम ठोकून आपले उखळ पांढरे करत असल्यामुळे “करा र्वक्षावर माया मिळेल थंडगार छाया,झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा पर्यावरण वाचवा हा शासनाचा मुलमंत्र लाकुडतोडीमुळे डबघाईला येवूनअवैध व्रक्ष तोडीमुळे वन्यजीव प्राण्यांचे शेतशिवारातील सावलीचे छत्र हरपल्याने वन्यजीवप्राणी वानर गावाकडील झाडाच्या सावलीकडे व पाण्याच्या शोधात प्राण्यांना विजेच्या धक्याने जिव गमवावा लागत आहे गावात सावलीच्या छत्रासाठी ठाण मारल्याने अनेकांच्या घरावरील पत्र्यांची नासधुस झाल्याने तालुक्यातील अनेक गावातील जनता या वन्यजीव प्राण्यांच्या त्रासाला वैतागून गेले आहेत.
उमरगा येथे उपविभागीय दंडाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय असताना व्रक्ष तोडीवर आळा बसत नाही त्यामुळे या सर्व बाबीकडे जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्यासाठी जनतेची मागणी जोर धरत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india