Best News Portal Development Company In India

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त उमरगा तालुक्यातील एकुरगा गावात अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते!

उमरगा/लोहारा आदिनाथ भालेराव.

जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या ८९५ व्या जयंतीनिमित्त उमरगा तालुक्यातील एकुरगा गावात अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास उपस्थित राहून गावातील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन करण्याचा सन्मान लाभला.

या पुतळ्यासाठी शरण पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून १५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून आज या पुतळ्याचे भूमिपूजन उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महात्मा बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. तसेच उपस्थित नागरिकांना महात्मा बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

महात्मा बसवेश्वर महाराजांनी १२ व्या शतकात ‘अनुभव मंटप’च्या माध्यमातून समाजाला समतेचा व लोकशाहीचा संदेश दिला. त्यांच्या विचारांमुळे समाज परिवर्तनाची नवी दिशा मिळाली असून आजही त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत, असे यावेळी नमूद केले.

यावेळी आमदार प्रवीण स्वामी, बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे, जि.प.सदस्य रफिक तांबोळी, हरिभाऊ जाधव, बापूराव पाटील, पद्माकर कुनाळे, चंद्रकांत कुंभार, अमर वाले, अनिल सगर, .आकाश इंगळे, दत्तात्रय कुनाळे, महेश पाटील, रामलिंग बिराजदार, गुंडेराव बोंडगे, विजय सोनकटाळे, महेश लिंबाळे, किशोर औरादे, चेतन कुनाळे, रवी करळे, दीपक करके, सुनील जवळगे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india