Best News Portal Development Company In India

खामसवाडीत जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या ; भांडण सोडवायला गेला अन जीव गमावला!

खामसवाडीत जमिनीच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; भांडण सोडवायला गेला अन जीव गमावला!
​तुळजापूर (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका २० वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुजित ज्ञानेश्वर शेळके असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात आरोपी विलास शिवाजी शेळके याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी विलास शिवाजी शेळके (वय ४८ वर्षे) हा फिर्यादी मनीषा ज्ञानेश्वर शेळके यांच्या घरात शिरला. जमिनीच्या वादाचे कारणावरून त्याने फिर्यादीच्या नातेवाईक सासू-सासऱ्यास अश्लील शिवीगाळ करत . लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
​हा वाद विकोपाला गेल्याचे पाहून फिर्यादीचा मुलगा सुजित शेळके (वय २० वर्षे) हा मध्यस्थी करण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी गेला. यावेळी संतापलेल्या आरोपीने आपल्या जवळील चाकूने सुजितच्या पोटात वार केले. हा वार इतका भीषण होता की, त्यात सुजितचा मृत्यू झाला.
​पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असुन
​या प्रकरणी मयत सुजितची आई मनीषा ज्ञानेश्वर शेळके यांनी १९ एप्रिल रोजी शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी विलास शेळके याच्यावर खालील कलमान्वये गुन्हा.
​भारतीय न्याय संहिता (BNS) कलम,​103(1)खून (Murder),​118(1)घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, (​333)अकारण घरात शिरणे (Trespass)
​352, 351(3) शांतता भंग आणि गुन्हेगारी धमकी
​”एका तरुण मुलाचा अशा प्रकारे बळी गेल्याने खामसवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जमिनीच्या वादाने पुन्हा एकदा रक्ताचे नाते काळवंडले आहे”. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी योग्य ती कारवाई करून एका आईस न्याय मिळावा प्रतिक्रिया ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india