Best News Portal Development Company In India

महाराष्ट्रात मुंबई येथे होणाऱ्या अमाप व्रक्ष तोडीवर निकिता रामाराणी या रणरागीणी ने पुकारला प्रशासना विरोधात बंड!

महाराष्ट्रात मुंबई येथे होणाऱ्या अमाप व्रक्ष तोडीवर निकिता रामाराणी या रणरागीणी ने पुकारला प्रशासना विरोधात बंड.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
निकिता रामाराणी यांनी मुंबई, महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अमाप व्रक्ष तोडीवर आळा घालण्यासाठी व निसर्गाचा बिघडलेला समतोल टीकुन राखण्यासाठी सरकारच्या विरोधात बंड पुकारण्यात आल्या नंतर उमरगा येथिल वात्सल्य बालग्रहाचे व महाराष्ट्र लोकविकास मंचचे भूमिपुत्र वाघ यांचा जहिर पाठिंबा दर्शविण्यात आला असुन निकिता रामाराणी
ही स्वयंसेविका मुंबई या ठिकाणी झाडे तोडून निसर्गाचं समतोल ढासळणाऱ्या सरकारच्या विरोधात उभी आहे.गेली २५ वर्षापासून महाराष्ट्र लोकविकास मंच या संघटनेसोबत ती कार्यकर्ती आहे.
वात्सल्य बालगृह उमरगा येथील मुलांना मदत करण्यासाठी गेली १० वर्षे त्यांनी खूप अथक परिश्रम घेतले आहे.
त्यांच म्हणणं आहे की मुंबई परिसरातील झाडे तोडू नयेत निसर्गाचं समतोल ढासाळु नये. त्या वन्यजीव प्राण्यासाठी, पक्षांसाठी, झाडांसाठी ,गेली वीस वर्ष संघर्ष करते आहे.म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केल आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र लोकविकास मंचच्या वतीने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान विश्वनाथ अण्णा तोडकर अध्यक्ष महाराष्ट्र लोक विकास मंच, सचिव भूमिपुत्र वाघ,संघटक रमाकांत कुलकर्णी, कालिंदी पाटील, मनीषा घुले, हरिश्चंद्र ढाकणे विलास कुलकर्णी, नागेश गायकवाड, यांनी पाठिंबा दिलेला आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india