Best News Portal Development Company In India

तुगाव येथील बौद्ध तरुणास मारहाण करणाऱ्या फरार गावगुंडाना तात्काळ अटक करावे : जिल्हाधिकारी यांच्या कडे ग्रामस्थांनी केली मागणी!

तुगाव येथील बौद्ध तरुणास मारहाण करणाऱ्या फरार गावगुंडाना तात्काळ अटक करावे : जिल्हाधिकारी यांच्या कडे ग्रामस्थांनी केली मागणी
– – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) येथून जवळच असलेल्या उमरगा तालुक्यातील तुगाव येथील बौद्ध तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गावगुंडाना तात्काळ अटक करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ समाजबांधावनी धाराशिव जिल्हा आधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.
तुगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व पोलिसी अधिक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की उमरगा तालुक्यातील तुगाव येथील बौद्ध तरुण भालचंद्र कांबळे यास गावातील जातीयवादी गावगुंड रोहीत दिपक जोमदे पंकज शंकर जोमदे महेश गहीनीनाथ जोमदे व चॉद अमिर फकीर या चौघानी संगनमत करून .रोहीत जोमदे यांच्या शेतात तो नको म्हणत असताना त्यास दोघानी मोटार सायकलवर बसवून नेवून लाथा बुक्यानी चामडी बेल्टने बेदम मारहाण केली.ते एवढ्यावरच न थांबता भालचंद्र कांबळे यास रोहीत जोमदे व पंकज जोमदे यानी त्यास द्राक्षेच्या बागेतील लोखंडी खांबाला त्याचे हातपाय बांधून काठ्यानी बेदम मारहाण करून गंभिर जखमी केले आहे. या मारहाणीत भालचंद्र कांबळे यांच्या पाठीची चाळण झाली असून अत्यंत भयानक मारहाण या चौघा जातीयवादी गावगुंडानी केली आहे.
सदरची घटना ही १८ मे २o२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान घडली त्यानंतर पिडीत तरुणाच्या घरच्यांनी भालचंद्र यास जखमी अवस्थेत मुरूम पोलीस ठाण्यात घेवून गेले असता तेथे त्यास उपचारसाठी मुरूम येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ मे रोजी दुपारी ४ वाजून १० मि . संबधीत आरोपी विरोधात रितसर गुन्हा नोंद करण्यात आला पण अध्याप एकाच आरोपीला ताब्यात घेण्यात आले बाकी मुख्य तीन आरोपी फरार असल्याचे सांगून पोलीस वेळ मारून नेत आहेत का? कारण संबधीत आरोपी हे एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे समजते याना कोणी राजकीय पुढारी अभय देतो आहे का ?. असा सवाल जनतेतून चर्चीला जात आहे .
शेवटी ना ईलाजास्तव येथिल फिर्यादी व गावातील ग्रामस्थ समाजबांधवनी संबधीत फरार आरोपीना तात्काळ अटक करावे या मागणी साठी वरिष्ठाधिकारी यांच्या कडे धाव घेतली असून या बाबतचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक धाराशिव यांच्याकडे दिले असून या निवेदनावर जवळपास तीस ते बत्तीस समाजबांधवांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी रिपाइंचे मराठवाडा उपाध्यक्ष पोपट लांडगे पत्रकार अरुण लोखंडे मुजावर शेख सह ग्रामस्थ उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india