*सैनिकांनी आंबेडकरांच्या विचारांशी व संघटनेशी एकनिष्ठ राहावे एड.डॉ.एस के भंडारे*
*२०२७ मधील जनगणनेत धर्म बौद्ध जात पूर्वीची भाषा पाली नोंद करा*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
(दि.१.) समता सैनिक दलाच्या सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनेशी एकनिष्ट राहावे आसे आवहान ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष एड. डॉ. एस के भंडारे यांनी उमरगा येथील समता सैनिक दलाच्या मेळाव्यामध्ये बोलत असताना केले.
समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांच्या हस्ते एस एस डी चा ध्वज फडकावून करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणानाचे प्रशिक्षक मेजर मल्हार लोंढे व उपस्थित सर्व समता सैनिक दलाचे सैनिक व प्रशिक्षणार्थी यांनी ध्वजाला सलामी दिली. व प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणामध्ये ८९ प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण घेतले. तर ११५ समता सैनिक दलाचे सैनिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
समता सैनिक दलाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर तसेच समता सैनिक दलाच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ एस के भंडारे, कार्यक्रमाच्या उद्घाटक जिल्हाध्यक्ष केंद्रीय शिक्षिका राजश्री कदम, कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे, उमरगा नगर परिषदेच्या नगरसेविका अश्विनीताई सोनकांबळे,सरचिटणीस विजय बनसोडे, संस्कार उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, सै जिल्हा संघटक प्रमाण गायकवाड जिल्हा संघटक विद्यालय कांबळे निक प्रशिक्षण नाचे प्रशिक्षक मेजर मल्हार लोंढे, सचिन दिलपाक अनिल सरतापे, वैभव शिरसाठ , चदनशिवे, आम्रपाली गौतसुर्वे , तालुका सरचिटणीस संगीता सोनकांबळे, तसेच सर्व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप धूप आणि पुष्पाने पूजन करण्यात आले व कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ एस के भंडारे साहेब यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार उमरगा तालुका शाखेच्या वतीने करण्यात आला तर जिल्हाध्यक्ष राजश्री ताई कदम यांनी महाराष्ट्रातून केंद्रीय शिक्षक या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या उमरगा नगरपरिषदेच्या नगरसेविका अश्विनीताई सोनकांबळे यांचाही सत्कार तालुका उमरगा शाखेच्या वतीने करण्यात आला.
बोलत असताना भंडारे म्हणाले की,बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या समता सैनिक दलाला २०२७ मार्च मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त प्रत्येक तालुक्यामध्ये २०० सैनिक ड्रेस झाले पाहीजेय.या साठी प्रत्येक तालुक्याने प्रशिक्षण शिबीर राबवुन नियोजन करणे अपेक्षित आहे त्या प्रमाणे उमरगा तालुक्याने BSI 25 MITION प्रमाणे योग्य दिशेने वाटचाल चालू असल्याचे मत व्यक्त केले.
समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व सैनिकांना व सर्व बौध्द उपासक उपासिका या सर्व नागरिकांनी महत्त्वाच्या तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असल्याचे मत भंडारे यांनी सांगितले..
त्यामध्ये प्रथम २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आपली नोंद करत असताना धर्माच्या जागांमध्ये बौद्ध धर्म असा लिहावे तसेच जातीच्या जागेमध्ये पूर्वीची जात नमूद करावी तसेच भाषेच्या जागेमध्ये पाली भाषा याची नोंद करावे असे आव्हान राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. एस के भंडारे यांनी व्यक्त केले.
उपवर्गीकरणाच्या माध्यमातून शेजारी राहत असलेला भावापासून भावाला वेगळे करणे त्यांच्यात भांडण लावणे हा उपक्रम सध्या मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे खंतही भंडारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळणाऱ्या मूलभूत सुविधा विषयी अभ्यास करण्यासाठी संविधानाचे वाचन करणे गरजेचे आहे त्याचबरोबर संविधानातील महत्त्वपूर्ण मूलभूत अधिकार समजून घेण्यासाठी कलम 14 ते 32 यामधील सर्व कलमांचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी समता सैनिक दलाच्या मेळाव्यास संबोधित करत असताना व्यक्त केले.
यावेळी समता सैनिक दलाचे जिल्हा सचिव सचिन दीपक, प्रशिक्षणाचे प्रशिक्षक मेजर मल्हारी लोंढे,, सरचिटणीस विजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम, प्रा. बापु गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणासाठी व समता सैनिक दलाच्या मेळाव्यासाठी व या मेळाव्यातील महत्त्वपूर्ण विषयी उपर्गीकरण धर्मांतरित कायदा बौद्ध जनगणना याविषयी सखोल असं मार्गदर्शन जीआरच्या प्रति सह सखोल अशी मार्गदर्शन एस के भंडारी यांनी केले.
समता सैनिक दलाच्या प्रत्येक सदस्याने आंबेडकरांच्या विचारांशी आंबेडकरांच्या घराण्याचे आणि आंबेडकरांच्या संघटनेची एकनिष्ठ राहून काम करणे गरजेचे आहे तसेच बीएसआय २५ मिशन अंतर्गत व शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबीर व समता संघाचा मेळावा यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचेच अभिनंदन असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. व उमरगा तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेचे काम होत असल्याचे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करत असताना भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष बौद्धाचार्य उमेश सुरवसे म्हणाले की,विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत तसेच BSI 25 मिशन अंतर्गत हे प्रशिक्षण शिबिर व समता सैनिक दल मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यासाठी राष्ट्रीय उपाध्यक्ष एड. डॉ एस के भंडारे साहेब यांनी वेळ दिल्याबद्दल या कार्यक्रमाला विशेष आकर्षण या ठिकाणी दिसून येत आहे.
देशाचे संपूर्ण कामकाज पाहत असताना उमरगा सारख्या शहरांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपला वेळ दिल्याबद्दल राष्ट्रीय उपाध्यक्ष समता सैनिक दलाचे स्टॉप ऑफिसर डॉ. एस के भंडारे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
पुढे बोलत असताना सुरवसे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्थेत आपण सर्वजण काम करत आहोत हे काम करत असताना आपण संस्थेचे ध्येय धोरणे व संस्थेचे आदेश पाळणे गरजेचे असल्याचे मत ही यावेळी बौध्दाचार्य उमेश सुरवसे यांनी व्यक्त केले. उपस्थित असलेल्या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आलेले प्रशिक्षणार्थी, समता सैनिक दलाच्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले सर्व सैनिक, सर्व बौद्ध बांधव यांचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष उमेश सुरवसे, तालुका सरचिटणीस संगीता ताई सोनकांबळे, , तालुका उपाध्यक्ष रेखाताई कांबळे, तालुका उपाध्यक्ष तातेराव मादळे, सचिव उषा गायकवाड, सचिव आशा काबळे,धिरज काबळे, मिलीद काबळे प्रा. शिवराम आडसुळे,सचिव सुरेखा काबळे,आनद गायकवाड,लिबारी गायकवाड शिवाजी कांबळे, विशाल काबळे, आधी कार्यकर्त्यांची उपस्थिती सहज सर्व गावातील समता सैनिक दलाचे सैनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका सरचिटणीस संगीताताई सोनकांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन जिल्हा संघटक ब्रह्मानंद गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप बौद्धाचार्य उमेश सुरवसे यांनी केले.






