Best News Portal Development Company In India

वागदरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा संपन्नः ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वागदरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा संपन्न : ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
—————————————————–
नळदुर्ग( एस.के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक बी.बी.सगर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांचा बाल आनंद मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यास गावातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडावी या संकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी येथे शालेय विद्यार्थ्यांच्या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ विक्रीचे स्टॉल लावले होते. यामध्ये गोड पदार्थ,भेळ,मिसळ,चिवडा फ्लावर बिर्याणी,भजी,वडा पाव, पाणीपूरी, वगेरे विक्रीचे स्टॉल लावले होते. एक प्रकारे बाजाराचे स्वरूप या शाळेत या आनंद मेळाव्याला आले होते. आपल्याच लेकरांचे विक्रीचे स्टॉल बघून पालकाना कुतूहल वाटत होते.स्टॉल चालक विद्यार्थीआपल्याच स्टॉलवरील माल खरेदीसाठी ग्राहकाना ओरडून आवाज देते होते. ग्रामस्थ व विद्यार्थी माल खरेदीसाठी प्रत्येक स्टॉलवर गर्दी करत होते. एक प्रकारे बाजाराचे स्वरूप या बाल आनंद मेळव्याला आले होते.हा बाल आनंद मेळवा यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक तानाजी लोहार,एन.एन.काळे, डि.बी.अनपट,सहशिकीका एस.एस. मसे मॅडम यानी परिश्रम घेतले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india