Best News Portal Development Company In India

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे धाराशिव, लातूर, बिड विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्धघाटन.

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे धाराशिव, लातूर, बिड विधानपरिषदेचे आमदार

बसवराज पाटील यांच्या हस्ते युवा

महोत्सवाचे उद्धघाटन.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित धाराशिव जिल्हा युवा महोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून विधान परिषदेचे आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. जिल्हाभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी आ.पाटील यांनी संवाद साधत त्यांच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि बौद्धिक गुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमासाठी सर्व सहभागी युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

आपल्या भाषणात आ.पाटील म्हणाले कि,

युवा शक्ती ही समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देणे, या दृष्टीने युवा महोत्सवासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यासोबतच विविध क्षेत्रातील नव्या संधींची ओळखही होते. पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले की,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर आणि येरमाळा येथील ज्ञान प्रसारक मंडळ संचालित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या विचारांना आणि कार्याला साजेसे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदान देण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक जाणीव, नेतृत्वक्षमता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. धाराशिव जिल्ह्यातील युवा प्रतिभेला एकत्र आणणारा हा युवा महोत्सव निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आ.पाटील यांनी व्यक्त केले.

महाविद्यालयाच्या वतीने उत्कृष्ट नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत, संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची प्रशंसा केली आणि संस्थेच्या पुढील वाटचालीस आ.बसवराज पाटील यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू विजयजी फुलारी सर, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, अध्यक्ष अनिलजी मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य अंकुशरावजी कदम, कळंब नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई कापसे, प्रा. संजय कांबळे, प्राचार्य हेमंतजी भगवान, डॉ. कैलासजी अंभुरे, प्रकाशजी आष्टे, दिलीपजी भालेराव, दादासाहेबजी पाटील, डॉ. संदीपजी देशमुख, प्रा. किशोरजी शिरसाट, प्रा. दिलीपजी महालिंग, डॉ. साकोळेजी, प्रा. संजयजी घुले, प्रकाशजी शिंदे, प्रा. सुनीलजी पवार, प्रा. भास्करजी खुसे, संजयजी बोंडार, सागरजी मुंडे, संताजी वीर, आबाजी मुंडे, अभिषेकजी गुजर, वैभवजी बारस्कर, चैतन्यजी मनगिरे, गुरुनाथजी बडुरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india