प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे 8 सप्टेंबरला तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कै. माधवरावजी काका पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुरूम येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वाद-विवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवासाठी तारक की मारक ?’ हा विषय असून, कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे, वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारी आव्हाने यावर विद्यार्थी आपली मते मांडणार आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षण, आरोग्य,
उद्योग, संशोधन, प्रशासनासह दैनंदिन जीवनाच्या विविध क्षेत्रांत वेगाने प्रवेश करत आहे. एकीकडे AI मुळे मानवी जीवन अधिक सुलभ व कार्यक्षम होत असताना दुसरीकडे रोजगार, गोपनीयता, तंत्रज्ञानावरील वाढते अवलंबित्व आणि त्याचा गैरवापर यासारखे प्रश्नही उपस्थित होत आहेत. या विषयाच्या दोन्ही बाजूंचा विद्यार्थ्यांनी चिकित्सक पद्धतीने विचार करावा, त्यांच्यात अभ्यास, वैचारिक मांडणी व वक्तृत्व कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील सांधिक प्रथम क्रमांक विजेत्या संघाला स्मृतीचिन्ह
व रोख 5001 रुपये, द्वितीय क्रमांकाला स्मृतिचिन्ह व रोख 3001 रुपये, तर तृतीय क्रमांकाला स्मृतीचिन्ह व रोख 2001 रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सहभागी सर्व शाळांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर स्पर्धा 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्रतिभा निकेतन उच्च माध्यमिक विद्यालय निवडून येथे पार पडणार आहे. शहर व तालुक्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी करून विचार आणि वक्तृत्व कौशल्य सादर करण्याची संधी द्यावी, असे आवाहन सांस्कृतिक विभाग प्रमुख व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





