Best News Portal Development Company In India

तुगांव येथे दहाव्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन: दहाव्या धम्म परिषदेसाठी”स्वागत अध्यक्ष, अध्यक्ष, उपाध्यक्ष खजिनदार सह नतून कार्यकारणी जाहीर.

तुगांव येथे दहाव्या अ भा बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन :
दहाव्या धम्म परिषदेसाठी” स्वागताध्यक्ष,अध्यक्ष व खजिनदारासह नूतन कार्यकारिणी जाहीर
——————————————————-
नळदुर्ग(एस.के. गायकवाड):
उमरगा तालुक्यातील तुगाव (जिल्हा धाराशिव) येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी दि.२५ डिसेंबर २o२५ रोजी अखिल भारतिय दहाव्या बौद्ध धम्म परिषदेचेआयोजन करण्यात आले आहे.
नियोजित धम्म परिषदेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने नुकतच येथिल त्रिरत्न बुध्द विहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला तुगावमधील सर्व नागरिक ,बंधू भगिनी,उपासक, उपासिका आणि मागील कार्यकारिणीतील सर्व सदस्यासह गावातील नागरिक ,समता सैनिक दलाचे पदाधिकारी ,महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
दहाव्या धम्म परिषदे बाबत कांहीं नवीन :संकल्पना आणि सूचना संदर्भात चर्चा विचारविनिमय करून यावर्षीच्या नुतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.लागलीच सामूहिक बुध्द वंदना झाली त्यानंतर या धम्म परिषदेचे मुख्या प्रवर्तक प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांनी प्रास्ताविकात आतापर्यंतच्या धम्म परिषदा,त्यामागील उद्देश व होणाऱ्या धम्म परिषदेसंदर्भात सविस्तर विवेचन केले.यावेळी प्रमुख उपस्थितीत सौ.रेखाताई सुधाकर गायकवाड,संगीता नंदू गायकवाड,सौ.पार्वती गायकवाड,सौ.इंदुबाई भालेराव,अश्विनी नागटिळे ,सौ,मंगल श्रवण कांबळे,जितेंद्र कांबळे,बलभीम गायकवाड,सचिन बनसोडे,संकल्प कांबळे,भालचंद्र लोखंडे आदींची आवर्जून उपस्थिती होती.
गेली आठ नऊ वर्ष तुगाव येथील ग्रामस्थ अतिशय रचनात्मक पद्धतीने तुगाव आणि पंचक्रोशीत धम्माचा सुमंगल विचार मनोमन रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. यावेळी बौध्द धम्मा संदर्भात अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करून आपल्या आचरणातून धम्माची व्याप्ती अधिकाधिक वाढविण्याचा दृढ निश्चय केला.त्यामुळेच याही वर्षी ही यशस्वी परंपरा दृगोचर करण्यासाठी नूतन पदाधिकारी व नवीन कर्यकरणीची निवड करण्यात आली त्यात अध्यक्ष म्हणून शाहूराज भोसले तर खजिनदार म्हणून नंदकुमार गायकवाड यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.शेवटी “आपण धम्म परिषदेच्या या उपक्रमशील कार्यरथाला सतत प्रोत्साहन देत अलात यापुढेही असेच सहकार्य करावे अशी विनंती उपासक दत्ताभाऊ कांबळे यांनी केली. आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.बैठकीचे सूत्रसंचालन धर्मेंद्र कांबळे आणि राजकुमार कांबळे यांनी केले.राष्ट्रगितानंतर बैठकीची सांगता झाली.
या प्रसंगी निवडण्यात आलेली संपूर्ण नुतन कार्यकारिण पुढील प्रमाणे स्वागताध्यक्ष भालचंद्र लोखंडे,अध्यक्ष शाहुराज
भोसले,सचिव तथा खजिनदार नंदकुमार गायकवाड,इतर कार्यकारणीतील सदस्य पुढील प्रमाणे सचिन बनसोडे राजकुमार कांबळे,संकल्प कांबळे,छाया बागडे,बलभीम गायकवाड,धर्मेंद्र कांबळे,सागर भोसले,गोपाळ सुरवसे,सुदर्शन कांबळे,अमृत कांबळे,विद्याचंद्र कांबळे,नीलकंठ (जॉन) कांबळे, दत्ताभाऊ कांबळे,धर्मा बनसोडे, विशाल कांबळे,लोकेश कांबळे,आकाश कांबळे,सुरज गायकवाड,सुधाकर गायकवाड, शिवाजी कांबळे,दिगंबर कांबळे कान्हा जाधव,अजय कांबळे, बाळू गायकवाड,विलास गायकवाड,राज गायकवाड, ऋतिक भैय्या बनसोडे,धर्मेंद्र कांबळे,सुमित गायकवाड आधीची निवड करण्यात आली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india