Best News Portal Development Company In India

नळदुर्ग चा आठवडी बाजार रविवार ऐवजी गुरुवारी भरणार: व्यापारी मंडळाचा निर्णय

नळदुर्ग चा आठवडी बाजार रविवार ऐवजी गुरुवारी भरणार : व्यापारी मंडळाचा निर्णय
—————————————————
नळदुर्ग (एस.के.गायकवाड ) :
दर रविवारी भरणारा तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग चा आठवडी बाजार रविवार ऐवजी गुरुवार दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी भरणार असल्याचा निर्णय येथील स्थानिक प्रशासन व व्यापारी मंडळांनी घेतला आहे.
या बाबत माहिती असी की रविवार दि. २१ दिसेंबर रोजी नुकतंच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे नळदुर्ग मध्ये चौकात मुख्य रस्त्यावर निश्चितच मोठी गर्दी होणार आहे शिवाय शेतकऱ्यांचा काळा आईची पूजा करणारा महत्त्वाचा सण म्हणजे येळाआमोशा हा सण शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २o२५ रोजी आहे.त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना भाजीपाल्याची आवश्यकता असते तसेच वर्षातून एकदा हा कौटुंबिक वनभोजनाचा आनंद देणारा हा सण असून शेतकरी कुटुंबाची भाजीपाल्या वाचून हेळसांड होऊ नये याचाही विचार करून येथील स्थानिक प्रशासन व व्यापारी मंडळांनी नळदुर्ग येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार हा रविवार ऐवजी गुरुवारी भरवण्यात येत असल्याचे येथील मुख्य चावडी चौकात फलक लावून आवाहन केले आहे.तरी व्यापारी मंडळांनी ग्राहकानी याची नोंद घ्यावी वास्तविक पाहता नळदृग हे जवळपास ६० ते ६५ गावाच्या केंद्रस्थानी असून आठवडी बाजारासाठी बऱ्याच गावातील लोक नळदुर्गला येतात रविवारी भरणारा हा बाजार येळाआमोशा सणाच्या दृष्टीने सोयीचा नाही शिवाय त्या दिवशी न.प.नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे त्यामुळे निकाल ऐकण्यासाठी इच्छुक असलेल्या मतदारांची जनतेची गर्दी शहरातील मुख्य चौकात बाजार पेठेत होणार आहे.त्यामुळे बाजार भरण्यासाठी रविवारी मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो याचा विचार करून व्यापारी मंडळाने रविवार ऐवजी नळदुर्गचा आठवडी बाजार गुरुवारी भरवण्याचा निर्णय घेतला असून हा बदल केवळ या आठवड्यासाठीच राहील पुढील आठवड्यापासून नळदुर्ग बाजार हा नियमानुसार दर रविवारीच भरेल तरी व्यापारी मंडळांनी व परिसरातील ग्रामस्थांनी याची नोंद घेऊन गुरुवारी भरणाऱ्या बाजारात येऊन भाजीपाला व अत्यावश्यक किराणामालाची खरेदी करावी असे आवाहन येथील व्यापारी मंडळांनी वार्ता फलकाच्या द्वारे केले आहे. यामुळे हा निर्णय जरी तांत्रिक बाब लक्षात घेऊन घेतलेला असला तरी याच दिवशी म्हणजे दर गुरुवारी तुळजापूर तालुक्यातील अणदूर चा आठवडी बाजार भरवला जातो हा बाजार सणाच्या एक दिवस अगोदर असल्यामुळे सर्वांच्या दृष्टीने सोईचा आहे त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये थोडीशा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आपला भाजीपाला घेऊन नळदुर्गला जायचे की अंणदुर च्या आठवडी.बाजारात घेऊन जायचा अशा मनस्थितीत व्यापारी राहणार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india