जळकोट भीमनगरमधील रस्त्याचे अर्धवट काम
गटारी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी नागरीकांच्या आरोग्यास धोका
– – – – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे) तुळजापूर तालुक्यातील जळकोट भीमनगर येथे अनुसूचीत जाती नवबौद्ध घटकांच्या योजने अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरुवात करण्यात आले मात्र ते पण अर्धवट स्थितीतच करण्यात आले
याबाबत प्राप्त माहीती अशी जळकोट भीमनगर येथे गेल्या दोन आडीच वर्षापासून रस्त्याची दुरवस्था झाली होती हर घर नळ योजनेच्या नावाखाली संपूर्ण रस्ते फोडण्यात आले होते . संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले होते त्यामुळे अनेक लहान मुले अबालवृद्ध माणसे पडून जखमी झाले होते अनेक वेळा या विषयावर संमधीत दैनिकांतून वेळोवेळी या कामी आवाज उठविण्यात आला होता . मग कुठेतरी संमधीत ग्रामपंचायतला जाग आली व अनुसुचीत जातीच्या विशेष नवबौद्ध योजने अंतर्गत काम मंजूर झाले मंजूर होऊन सहा महीने झाले सहा महिन्यानी कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली काही गल्लीतील रस्ते तयार करण्यात आले . भीमनगर मधील मुख्य रस्त्यापर्यंत काम आले . पण ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा संबंधी उपसंरपंचानी आवाज उठविल्याने गावात वातावरण चांगलेच गरम झाले . ग्रामपंचायत आणि उपरसंरपंच याच्यात वाद निर्माण झाला . आणि या कामाला ब्रेक लागला . त्याचे कारणही तसेच आहे संमधीत ज्याने काम घेतले आहे तो विद्यमान उपसंरपंच यांच्या भावाने घेतले आहे . काय जाणे भावाला सरपंचांनी विशेष सभा घेवून अर्वाच्य भाषेत नाक रगडून माफी मागण्या इतपत बोलले म्हणून काम बंद केले आहे काय असा अंदाज वर्तविण्यात येत आहे . सदरचे काम तात्काळ चालू करून रस्ता पूर्ण करावे कारण रस्त्यावर पसरत असलेले गटारीच्या पाण्यातूनच येथील नागरीकांना ये जा करावे लागत आहे . यामुळे मच्छर आणि डासांचे प्रमाण वाढले असुन येथील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येण्याची संभावना नाकारता येत नाही .






