तुळजापूर येथे रिपाइं (आठवले) च्या वतीने नामविस्तार दिन उत्साहात साजरा
—————————————————
नळदुर्ग ( एस. के. गायकवाड ):
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद )चा ३४ वा नामविस्तार वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आनंदीव वातावरणामध्ये तुळजापूर येथील आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले )च्या वतीने साजरा करण्यात आला.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करून पेढे वाटून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)चा नामविस्तार वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे धाराशिव जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेक मस्ते, तुळजापूर शहर शहराध्यक्ष वैजनाथ पांडागळे,यूवा आघाडीचे धम्मशील कदम,तानाजी उमाजी कदम,मनोज धांडे, रिपाइं ओबीसी आघाडी शहराध्यक्ष लहू घोडके बाळू कदम,बालाजी जाधव, महादू,सोनवणे,महेश इंदापुरे,संदीप कदम,मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.






