Best News Portal Development Company In India

नळदुर्ग नगर परिषदेच्या गटनेते पदाची सूत्रे हाती घेताच मारुती खारवे यांनी स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करून केली स्वच्छतेची मागणी!

नळदुर्ग नगर परिषदेच्या गटनेते पदाची सूत्रे हाती मिळताचं मारुती खारवे यांनी येथील प्रत्येक प्रभागातील अस्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करून केली स्वच्छतेची मागणी
—————————————————–
नळदुर्ग ( एस. के.गायकवाड):
मानवी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब असून सध्या नळदुर्ग शहरात प्रत्येक प्रभागात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसून येत आहे तेंव्हा नगरपरिषदेने नळदुर्ग शरातील प्रत्येक प्रभागातील अंतर्गत गटारी,रस्ते स्वच्छ करून येथील मानवी आरोग्यास होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी नळदुर्ग नगर परिषदेचे नूतन नगर सेवक तथा विरोधी पक्ष गट नेते मारूती खारवे यांनी लेखी निवेदनाद्वारे संबंधित मुख्याधिकारी यांच्या कडे केली आहे.
नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गेल्या दोन महिन्यापासून नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे येथील सर्व प्रभागातील स्वच्छतेच्या दृष्टीने दुर्लक्ष होत असून प्रत्येक प्रभागात काही ठिकाणी गटारी तूंबलेले असून त्या स्वच्छ केलेल्या नाहीत त्यामुळे घाण सांडपाणी रस्त्यावर येऊन घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारली जात नाही अशी तक्रार नागरिकांतून होत आहे.ज्या संस्थेला स्वच्छतेचे टेंडर मिळाले आहे त्या संस्थेने शहरातील प्रत्येक प्रभागातील तुंबलेल्या गटारी व रस्ते स्वच्छ करून कचरा वेळच्यावेळी उचलून शहरात प्रत्येक प्रभागात स्वच्छता ठेवून येथील मानवी आरोग्यास होणारा संभाव्य धोका टाळावा अशी मागणी त्यांनी लेखणी केली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india