Best News Portal Development Company In India

विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी आपण निवडणूक लढवत आहोत; सिद्धू अण्णा कोरे

विकासात्मक दृष्टिकोण समोर ठेवून जनतेच्या सेवेसाठी आपण निवडणूक लढवीत आहोत : सिद्धू अण्णा कोरे .
——————————————————-
नळदुर्ग ( एस.के.गायकवाड):
सबके साथ । सबका विकास । .सबका विश्वास। सबका प्रयास । हा पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार आत्मसात करून महाराष्ट्राचे कार्यकुशल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लाडके आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागाचा विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्याकरिता आपण तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून भाजपा महायुतीचे उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवीत आहोत. तरी कमळ या चिन्हा समोरीलं बटण दाबून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा रिपाइं (आठवले),राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिव सेना (एकनाथ शिंदे).व मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर कोरे अर्थात सिद्धू अण्णा कोरे यांनी खुदावाडी येथे आयोजित कॉर्नर सभेमध्ये बोलताना केले.
नंदगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा महायुतीचे उमेदवार सिद्धेश्वर कोरे,नंदगाव जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती खुदावाडी गणातील उमेदवार भिवाजी इंगोले व नंदगाव पंचायत समिती गणातील उमेदवार सौ.रोहीणीताई विवेकानंद मिलगिरी यांच्या प्रचारार्थ खुदावाडी येथे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या वतीने कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेच्या अध्यक्षस्थानी खुदावाडी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ब्रम्हनंद कापसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भिमाशंकर कबाडे हे होते. या प्रसंगी सिद्धेश्वर कोरे बोलत होते. प्रारंभी घरभेटी देवून येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर व विठ्ठल रुक्माई मंदीर दैवतांचे पूजन करून दर्शन घेऊन या सभेला सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी खुदावाडी पंचायत समिती गणाचे उमेदवार भिवाजी इंगोले,भाजपाचे विवेकानंद मिलगिरी,रिपाइं (आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,नळदुर्ग नगर परिषदेचे अध्यक्ष बसवेश्वरआप्पा धरणे,भाजपा मीडिया सेल चे तालुकाध्यक्ष किशोर धुमाळ, पत्रकार निजाम शेख,आदींची ही भाषणे झाली. यावेळी भाजपा चे अंगद जाधव, दामाजी राठोड, लक्ष्मन राठोड, माजी नगर सेवक किशोर नळदुर्गकर,राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रा. शिवाजी मारेकर सह नंदगाव जिल्हा परिषद गटातील आणि गणातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव सालगे यांनी केले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india