Best News Portal Development Company In India

खतांची आणि बी- बियाण्यांची निवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम माती परीक्षण करणे गरजेचे आहे: प्राध्यापक बी. एम. बंदीछोडे.

खतांची आणि बि-बियाणांची निवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम माती परीक्षण करणे गरजेचे आहे :
प्रा.बी.एम.बंदीछोडे
—————————————————–
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
शेतकऱ्यांनी सोयाबीन,ऊस किंवा अन्य पिकांची लागवड करण्यापूर्वी आपल्या शेतजमिनीतील माती परीक्षण करूनच खतांची मात्रा आणि बी बियाणे निश्चित करूनचं पिकांची लागवड करावी त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळेल असे प्रतिपादन सोयाबीन व ऊस तज्ञ प्रा.बी. एम.बंदिछोडे यांनी वागदरी तालुका तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
शिव- बसव-राणा व काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी तालुका तुळजापूरच्या वतीने शिवजयंती निमित्ताने दिनांक १३ ते १९ फेब्रुवारी २o२६ दरम्यान शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहातील व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना प्रा.बी.एम. बंदीछोडे हे बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की शेतकरी अधिक आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी ऊस किंवा सोयाबीन पिक लागवडीची निवड मोठ्या प्रमाणात करत असताना दिसतात तरी आपल्या शेतात ऊस लागवड करण्यापूर्वी बियाणे म्हणून ऊसाच्या कांडीपेक्षा आधुनिक पद्धतीने सध्या नर्सरीमध्ये ऊसाचे रोप उपलब्ध आहे तरी शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीतील मातीचे परीक्षण करून ऊस पिकाचे रोप नर्सरीतून आणून त्याची योग्य पद्धतीने दोन सरी मध्ये ठराविक अंतर ठेवून लागवड करावी व त्या उसाला लागणारे खत कोणते आणि किती प्रमाणात वापरावे याची माहिती माती परीक्षणाच्या आधारे घेऊनच खताची मात्रा निश्चित करावी अंतर्गत मशागत करून वेळच्यावेळी पाणी दिल्यास एकरी ऊसाच्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईल तेंव्हा शेतकऱ्यांनी याची काळजी घेऊन उसाची लागवड करावी. सोयाबीन पीक पेरणी करत असताना देखील पाण्याचे क्षेत्र कोरडवाहू क्षेत्र माती परीक्षण याचा अभ्यास करून वेळच्यावेळी फवारण्या करून सोयाबीन पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्याच्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होईलअसे सांगीतले.
. प्रारंभी छत्रपती शिवाजी, महाराज,महात्मा बसवेश्वर व श्री संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून व्याख्यानाला सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विचारपिठावर प्रा.सचिन मिटकर व युवा शेतकरी गोपाळ उर्फ बाळू यादव हे उपस्थित होते. याप्रसंगी समोर बसलेल्या उपस्थित शेतकऱ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या शंका कुशंका याचे निरसन करत प्रा.बी.एम. बंदीछोडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी सदन शेतकरी ह भ प राजकुमार पाटील,फत्तेसिंग ठाकूर,रामचंद्र यादव,शशिकांत बिराजदार,भरतसिंह ठाकुर अमोल गोगावे,ग्रा.प.सदस्य अमोल पवार सह शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india