Best News Portal Development Company In India

जळकोट भिम नगर येथे अंतर्गत गटारी तुंबल्या पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली आदीसह अनेक समस्या, संबंधित ग्रामपंचायत विकास अधिकारी (ग्रामसेवक) व लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दुर्लक्ष : रिपाइं (आठवले) ने दिला ग्रामपंचायतला टाळा ठोकण्याचा इशारा!

जळकोट भिम नगर येथे अंतर्गत गटारी तुंबल्या पिण्याचे पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन फुटली आदीसह अनेक समस्या, संबंधित ग्रामपंचायत विकास अधिकारी (ग्रामसेवक) व लोकप्रतिनिधी यांचे अक्षम्य दुर्लक्ष : रिपाइं (आठवले) ने दिला ग्रामपंचायतला टाळा ठोकण्याचा इशारा
—————————————————-
जळकोट (अरुण लोखंडे)
तुळजापूर तालुक्यातील भिमनगर जळकोट येथील अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम प्रलंबित असून भीम नगरला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन एके ठिकाणी फुटलेली असून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे तेच पाणी परत पाईपमध्ये जावून पाणी दूषीत होत आहे आणि. त्यामुळे अंतर्गत गटारी पाण्याने तुबल्याने येथे घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत्याने येथील ग्रामस्थाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
. तसेच येथिल महमानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरील पटांगणात बसविण्यात आलेला हायमस्ट पद दिवे गेल्या दोन-तीन वर्षापासून बंद स्थितीत आहेत. अशा अनेक समस्यानी येथील भिमनगर घेरलेले आहे.अनेक वेळा संबंधीताना तोंडी विनंती करून सुद्धा येथील ग्रामपंचायत विकास अधिकारी व संबंधित लोकनिधीनी याकडे अक्षम्य दुर्लक्षच केले आहे.असी लेखी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संबंधित गटविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे.
. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे यांनी एक लेखी निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की येथील भिमनगर मध्ये अनुसुचीत जाती नवबौद्ध विकास घटक योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाला मंजुरी होऊन अंतर्गत सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते परंतु गेल्या चार-पाच महिन्या पासून ते काम अर्धवट अवस्थेत असून हात्ती गेला आणि शेपुट आडकला असी आवस्था झाली आहे संबंधित गुत्तेदारानी अर्धवट काम करून हे काम सोडून गेले आहे ..तरी गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित असलेले सिमेंट रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे व येथील मुकूंद लोखंडे यांचा घरासमोरील पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटलेली असून त्यामुळे शेकडे लिटर पाणी वाया जात आहे ते दुषीत पाणी पिल्याने येथील लहान बालके तसेच नागरीकांना याचा त्रास होत आहे . व त्या पाण्यामुळे अंतर्गत गटारी ह्या तुंबलेल्या असून भीम नगर परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे व सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच या गटारीचे घाण पाणी ज्या ठिकाणी पाईपलाईन फुटले आहे तिथून मिसळत आहे व ते भीम नगरला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी नळाला जात आहे तसेच येथील पाणी टाकी सहा सहा महिने धुतली जात नाही व पाण्यामध्ये जंतुनाशक पावडर टाकले जात नाही त्यामुळे येथील नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे दूषित पाणी पिल्यामुळे येथील अबालवृद्धना आजाराला सामोरे जावे लागत आहे तसेच समाज मंदिर समोरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर पटांगणामध्ये बसविण्यात आलेला हाय मोस्ट पथदिवे दोन-तीन वर्षापासून बंद स्थितीत आहे तरी या सर्व समस्या कडे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन या सर्व समस्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत दिनांक 14 एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण कराव्यात अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन ग्रामपंचायतला टाळा ठोक आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे सदरचे निवेदन हे पंचायत समिती तुळजापूरचे गटविकास अधिकारी हेमंत भिगारदिवे यांनी स्वीकारले असून याप्रसंगी रिपाइं चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड हे उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india