बहुजन हिताय वस्तिग्रहात बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियान कार्यशाळा संपन्न.
तुरोरी दमयंती भालेराव.
दि. १८ मार्च २०२६ रोजी, समाज कल्याण विभाग जि. प. धाराशिव याच्या महाराष्ट्र शासन अनुदानित बहुजन हिताय विद्यार्थी वस्तीगृहामध्ये महिला व बालकल्याण विभाग धाराशिव यांच्या वतीने चालू असलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ या जागृती अभियांनांतर्गत वसतिगृहातील विद्यार्थी, कर्मचारी पदाधिकारी यांचेकरिता कार्यशाळा घेण्यात आली.
या जागृती सत्रामध्ये मध्ये महिला व बालविकास विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी उमरगा चे मा. रवी धनवे, समुपदेशक मा. अनुराधा झुंजारे, मा. प्रणाली पात्रे समुपदेशक यांनी सर्वाना उत्तम मार्गदर्शन केले.
मा. रवी धनवे यांनी महिला व बाल विकास विभागाच्या योजनाची, आणि किशोरवयीन विद्यार्थ्यांनी एस. एस. सी. पर्यंत स्वतःची काळजी घेऊन व्यक्तीत्व विकास, स्पर्धा परीक्षा,करियर आणि जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी, स्वावलंबन, शिस्त, अभ्यासात एकाग्र आणि प्रतिज्ञाबद्ध राहून स्वतःचा विकास साधावा असे मौल्यवान मार्गदर्शन केले यासाठी सर्व ऐकलं पालक, अनाथ ई. विद्यार्थी /विद्यार्थिनी साठी शासनाच्या अनेक योजनाचा पुरेपूर लाभ घ्यावा, त्यांनी आपल्याभाषणात विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण केली.
श्रीमती अनुराधा झुंजारे यांनी शासनाच्या योजनाचा लाभ कोण घेऊ शकतो आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची आणि प्रक्रियेची माहिती दिली.
श्रीमती प्रणाली पात्रे यांनी बालसंगोपन, बाल संरक्षण आणि बालकांचा विकास व त्यासाठी असणाऱ्या शासन योजना यांची माहिती दिली.
सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्री माई फुले, स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ माँसाहेब, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी मैत्री गीत सादर केले. पाहुण्यांचे पुष्प देवून वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. सूत्र संचालन वसतिगृह अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी तर आभार मा. प्रणालीताई यांनी मानले. या कार्यक्रमचा लाभ सर्व कर्मचारी काही हितचिंतक व सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी घेतला.






